ना हुंड्यासाठी छळ, ना मारझोड! तरी पत्नीने पतीविरोधात मागितला घटस्फोट... कारण ऐकून वकीलही हैराण
पती-पत्नी विभक्त होण्यामागे अनेक कारणं असतात. कधी हुंड्यासाठी छळ, तर कधी मारझोड, कधी किरकोळ भांडणही पती-पत्नीच्या घटस्फोटाच कारण ठरतं. पण मुंबईत एका महिलेने आपल्या पतीविरोधात कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. घटस्फोटाचं कारण ऐकून कोर्टातले वकीलही हैराण झाले.
Trending News : पती-पत्नीच्या प्रेमळ नात्याला सुख:-दु:खाची किनार असते. कधी प्रेम तर कधी भांडणं असतात. पण काही वेळा ही भांडणं टोकाला जातात आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत (Devorce) येऊन पोहोचतं. अनेक वर्षांचा संसार काही महिन्यात संपवला जातो. अनेक जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे मुख्य कारण म्हणजे कौटुंबिक जबाबदाऱ्या. काही वेळा दोघांमधील विसंवादामुळे तर काही वेळा आर्थिक कारणामुळे घटस्फोट होतात. हुंड्यासाठी छळ मारझोड तर कधी अगदी किरकोळ भांडणंही टोकाचं रुप घेतात. घटस्फोटाची अनेक प्रकरण आजही कोर्टात प्रलंबित आहेत. यात दोनही पक्षांना मनस्ताप सहन करावा लागतो.
घटस्फोटाचं विचित्र कारण
घटस्फोटाचं असंच एक प्रकरण सध्या चांगलाच गाजतंय. एका महिलेने आपल्या पतीविरोधात घटस्फोटासाठी अर्ज केला. पण घटस्फोटाचं कारण ऐकून वकीलही हैराण झाले. तक्रारदार महिलेच्या वकिलांनी घटस्फोटाचं कारण सोशल मीडियावर शेअर केलं आहे. हे कारण ऐकून कपाळावर हात मारून घ्यावासा वाटेल. तान्या अपाचू कौल (Tanya Appachu Kaul) असं या महिला वकीलाचं नाव आहे. तान्या कौल या मुंबईत राहातात आणि त्या कंटेंट क्रिएटरदेखील आहेत. तान्या कौल यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) एक व्हिडिओ शेअर करत सध्याच्या युवा पिढीत कोणत्या कारणावरुन घटस्फोट होतात याची कारण सांगितली आहे.
एका प्रकरणात पत्नीने हनीमुन दरम्यान अश्लील पद्धतीचे कपडे घातले म्हणून पतीने पत्नीला घटस्फोट दिला. तर एका प्रकरणात पती स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता आणि तो वेळ देत नसल्याने पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला. पण तान्या कौल यांनी सांगितलेलं एक कारण मात्र विचित्र पण तितकंच विचार करायला लावणारं आहे. एका महिलेने आपल्या पतीविरोधात घटस्फोटासाठी अर्ज केला. कारण पतीन तिच्यावर जास्त प्रमाणात प्रेम करतो. पतीचं अतिरेकी प्रेम नकोसं झाल्याने या महिलेला पतीकडून घटस्फोट हवा होता.
या महिलेच्या तक्रारीनुसार पती प्रमाणापेक्षा तिच्यावर जास्त प्रेम करतो. प्रमाणापेक्षा तिची जास्त काळजी घेतो. इतकंच काय तर त्याला आपल्या कोणत्याही गोष्टीवर आक्षेप नसतो. लग्नाला 18 महिने झाल्यानंतरही पती एकदाही भांडला नाही असं या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलंय आहे.
घटस्फोटाची कारणं
तान्या कौल यांनी आपल्या व्हिडिओत घटस्फोटाच्या अनेक कारणांची यादी दिली आहे. पत्नी पतीच्या पाया पडली नाही म्हणून घटस्फोट, पत्नीला जेवणं बनवता येत नाही म्हणून घटस्फोट, तर काही प्रकरणात कामाला जाताना पत्नी नाश्ता देत नाही म्हणून घटस्फोट, अशी विचित्र कारणं तान्या कौल यांनी सांगितली आहे. त्यांना कौल यांचा हा व्हिडिओ तब्बल 16 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेलाय. एका लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर हजारो कमेंटस आल्या आहेत.