Mosquitoes Home Remedies: डासांच्या प्रादुर्भावामुळे हैराण, करा हे 4 घरगुती उपाय; तात्काळ आराम
Remedies for Mosquitoes: जर तुम्हालाही डासांचा (Mosquitoes) त्रास होत असेल तर यावर एक उपाय आहे. आम्ही तुम्हाला डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सोपे घरगुती उपाय सांगत आहोत. या उपायाचा अवलंब केल्याने डास तुमच्या खोलीतून बाहेर पडतीलच. तसेच ते घरातूनही पळून जातील.
Mosquitoes Prevention Remedies: पावसाळा संपत आला आहे. आता ऑक्टोबर महिना सुरु होत आहे. त्यामुळे कडक उन्हाळा लोकांना हैराण करत असतो. या मोसमात डासांचा (Mosquitoes) प्रादुर्भावही दरवर्षी वाढतो. जर तुम्हालाही डास चावल्यामुळे त्रास होत असेल तर काळजी करु नका. आज आम्ही तुम्हाला खोलीतून डासांना तात्काळ बाहेर काढण्याचे घरगुती उपाय सांगत आहोत. हा उपाय अतिशय स्वस्त आणि उपयुक्त आहे. त्याच्या वापरामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही. ते उपाय काय आहेत ते जाणून घ्या.
High Cholesterol : हे फळ खाल्ल्याने कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल
खोलीत कापूर टिक्की ठेवा
कापूर (Camphor) हा कीटकांना दूर करण्याचा सर्वोत्तम उपाय मानला जातो. जर तुम्हीही डासांच्या प्रादुर्भावाने त्रस्त असाल तर तुम्ही कापूरचा उपाय करू शकता. तुम्ही 2-3 कापूर टिक्की जाळून खोलीत ठेवा. यानंतर, खोली काही काळ बंद करा. जेव्हा कापूरचा वास संपूर्ण खोलीत पसरतो तेव्हा दार उघडा. डास कापूरच्या वासाने (Mosquitoes Home Remedies) ताबडतोब खोली सोडतात आणि बाहेर पळतात.
कडुलिंबाच्या हिरव्या पानांचा धूर करा
कडुलिंब (Neem) ही आयुर्वेदिक वनस्पती म्हणून उत्तम मानली जाते. जर तुमच्या घरावर डासांनी हल्ला केला असेल तर खोलीत कडुनिंबाची काही हिरवी पाने आणावीत. त्यानंतर ती जाळून धूर करावा. लक्षात ठेवा की पाने जळू नयेत, परंतु त्यातून फक्त धूर निघावा. हा घरगुती उपायाने डास केवळ खोलीच नाही तर संपूर्ण घर सोडून जाईल आणि थक्क होईल. तुम्हाला हवे असल्यास डास चावण्यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही कडुलिंबाचे तेल वापरु शकता.
लसणाची पातळ पेस्ट वापरा
लसणाचा (Garlic)सुगंध थोडा तिखट असतो, जो डासांना सहन होत नाही. सहसा, जिथे लसूण ठेवला जातो, तिथे डास कधीच फिरकत नाहीत. जर डासांनी घरात दहशत निर्माण केली असेल तर लसणाची पातळ पेस्ट तयार करा. यानंतर ते द्रावण घराच्या सर्व कोपऱ्यात शिंपडा. त्या खोलीतून डास पटापट बाहेर पडताना तुम्हाला दिसतील.
पुदिन्याचा रस फायदेशीर
पुदिना (Mint)फक्त खायलाच स्वादिष्ट नाही तर त्यात अनेक आयुर्वेदिक गुणधर्मही दडलेले आहेत. डासांना घालवण्यासाठी पुदिना देखील खूप प्रभावी आहे. पुदिन्याचा रस किंवा तेल काढा. त्यानंतर हा रस घराच्या कानाकोपऱ्यात थोडा थोडा शिंपडा. वासामुळे डास तेथे जास्त काळ राहू शकणार नाहीत आणि तेथून लगेच पळून जातील.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे तुम्ही वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)