Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) केवळ लाईक मिळवण्यासाठी अनेक जण रिल्स (Reels) बनवत असतात. पण प्रसिद्धीच्या नादात नको त्या गोष्टींना प्राधान्य देतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून नेटिझन्सने (netizens) संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी एका महिलेने आपल्या मुलाबरोबर रोमँटिक डान्स (romantic dance) केला आणि ते व्हिडिओ व्हायरल केले. सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सने त्या महिलेवर टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे व्हायरल व्हिडिओत?
सोशल मीडियावर आई-मुलाचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. या दोघांना शाहरुख खानच्या 'झुमे जो पठाण...' या गाण्यावर डान्स केला आहे. या आई-मुलाचे याआधीही अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. अनेक रोमँटिक गाण्यांवर या दोघांनी व्हिडिओ बनवले आहेत. त्यांच्या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही युजर्सने त्यांना ट्रोल केलं आहे, तर काही युजर्सने त्यांच्या अभिनयाला दाद दिली आहे. 


व्हिडिओ अपलोड करणाऱ्या मुलाचं नाव रिकी पटेल असं असून तो बालकलाकर आहे. तर इन्स्टाग्रामवर त्याच्या आईचं नाव मिंकू सिंह असं आहे. मिंकू सिंह ही फिटनेस फ्रीक असून फॅशन आणि ट्रॅव्हल हे तिचे छंद आहेत. नुकताच तिने आपला मुलगा रिकीबरोबर Pathaan चित्रपाटील हिट गाणं 'झूमे जो पठान' वर डान्स व्हिडिओ शूट केला.  हा व्हिडिओ आतापर्यंत 20 लाखाहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Ricky Patel (@rickypatel642)


या शिवाय या आई-मुलाच्या जोडीने हिंदी गाण्यांवरचे अनेक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. एका व्हिडिओत ते गोव्यातील समुद्र किनारी डान्स करताना दिसत आहेत. तर एका व्हिडिओत  Baby, Come Down या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. काही व्हिडिओजमध्ये ते रोमँटिक डायलॉग्जवर लिपसिंग करताना पाहिला मिळतात.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Ricky Patel (@rickypatel642)


एका पोस्टमध्ये रिकीने आपल्या आईला 'मोस्ट बोल्ड' आणि 'स्ट्राँग वुमन' म्हटलं आहे. याबरोबरच त्याने आपल्याला पाठिंबा दिल्याबदद्ल आणि फॉलो केल्याबद्दल युजर्सचे आभार मानले आहेत. इन्स्टाग्रामवर रिकी पटेलचे 70 हजाराहून अधिका फॉलोअर्स आहेत. तर मिंकू सिंहला 15 हजाराहून अधिकजण फॉलो करतात. रिकीच्या व्हिडिओजला लाखोंनी व्ह्यूज मिळतात. यात त्याच्या फॅशनची अनेक जण स्तुती करतात. 


पण काही जणांनी त्यांच्या डान्सवर टीका देखील केली आहे. काही जणांनी कपल सारख्या पोज देण्यावरुन दोघांवर टीका केली करत मर्यादेची आठवण करुन दिली आहे.