Viral News : आश्चर्यकारक! गाणी ऐकणाऱ्या गाई- म्हशी जास्त दूध देतात; संशोधनातून अफलातून माहिती समोर
Cow Research : एका संशोधनातून असा दावा करण्यात आला की, गाणी ऐकणाऱ्या गाई- म्हशी जास्त दूध देतात, आश्चर्य वाटलं ना...
NDRI Research : आपण म्युझिक थेरपी हे ऐकली असेल. तणावपासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक वेळा तज्ज्ञ म्युझिक थेरपीचा वापर करतात. संगीत ऐकल्यामुळे आपण तणाव मुक्त होतो असं अनेक संशोधनातून समोर आलं आहे. पण हीच थेरपी गाय आणि म्हशींबद्दल वापरल्यास फायदा होतो, असं एका संशोधनातून दावा करण्यात आला आहे.
हरियाणामधील नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट,(NDRI) कर्नाल या संस्थेनुसार गाय आणि म्हशीला संगीत ऐकवल्यास त्या तणावमुक्त होतात आणि जास्त प्रमाणात दूध देतात. या संगीत थेरपीचा अनोखा वापर ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
माणसांना जसं संगीत ऐकायला आवडतं तसं गाय आणि म्हशींनाही संगीत ऐकायला आवडतं, असा दावा या संशोधनातून करण्यात आला आहे. या संशोधनाच्या शास्त्राने सांगितलं की, त्यांनी खूप वर्षांपूर्वी ऐकलं होतं की गायीला संगीत ऐकायला आवडतं. त्यामुळे हा प्रयोग करण्याचा आम्ही विचार केला. हा प्रयोगाचा सकारात्मक परिणाम दिसून आला. (trending news music increases cows buffaloes milk haryana karnal ndri research)
संगीत लहरी गायीच्या मेंदूतील ऑक्सिटोसिन हार्मोन सक्रिय करतात आणि त्याचा परिणाम त्या तणावमुक्त होतात. त्यामुळे त्या अधिक दूध देतात. खरं तर हे संशोधन गायींना तणावमुक्त ठेवण्यासाठी केला जात होता. त्या प्रयोगादरम्यान गायीच्या वर्तनात सकारात्मक परिणाम दिसून आला.
या संशोधनातून असंही दिसून आलं की, संगीत ऐकल्यामुळे गायींना प्रचंड उष्णतेपासून आराम मिळतो. संगीत ऐकलं की त्या निवांत बसतात. शिवाय ज्येष्ठ प्राणी शास्त्रज्ञ डॉ. आशुतोष म्हणाले की, भगवान श्रीकृष्ण जेव्हा मुरली वाजवायचे तेव्हा गायी मंत्रमुग्ध व्हायच्या. बस याच थेरीवर हा प्रयोग करण्यात आला आहे.
NDRI या संस्थेची स्थापना 1955 साली झाली आहे. तेव्हापासून या संस्थेमध्ये प्राण्यांवर अनेक प्रकारचे संशोधन करण्यात येतं आहे. देशी गायींवरही अनेक प्रयोग करण्यात आले आहेत. या प्रयोगादरम्यान गायींना एका ठिकाणी बांधून ठेवण्यात येतं नाही. कारण जर त्यांना बांधून ठेवल्यास त्या तणावग्रस्त होतात, असंही आशुतोष यांनी सांगितलं आहे.
एनडीआरआयची शाखा असलेल्या हवामान प्रतिरोधक पशुधन संशोधन केंद्राने चार वर्षापासून यावर संशोधन सुरु आहे. या प्रयोगासाठी हजारो दुभत्या जनावरांचा समावेश करण्यात आला होता. या संशोधनातून असं दिसून आलं की, संगीत ऐकल्याने प्राण्यांचं आरोग्य चांगल राहण्यास मदत होते. एवंढच नाही तर त्यामुळे गायी आणि म्हशींचं दूध देण्याची क्षमता वाढते. दरम्यान गायी आणि म्हैशींना बांधून न ठेवण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे.