Trending Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती चक्क रेल्वे रुळावर (Railway Track) झोपलेला दिसतोय.  ऊन लागू नये म्हणून त्याने छत्रीही उघडलेली दिसतेय. गमछा डोक्याखाली घेऊन तो रुळावर अगदी शांतपणे झोपलेला दिसतोय. रुळावरुन वेगावने ट्रेन ये-जा करतात याची त्याला पुसटशी कल्पनाही नाही. सुदैवाने याच रुळावरुन येणाऱ्या एका ट्रेनच्या मोटरमनने (Motorman) झोपलेल्या या व्यक्तीला पाहिलं आणि ट्रेन थांबवली. यानंतरही तो व्यक्ती न उठल्याने अखेर मोटरमननला खाली उतरावं लागलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ (Viral Video) उत्तर प्रदेशमधला आहे. मोटरमनने खाली उतरुन झोपलेल्या त्य व्यक्तीला अखेर उठवलं आणि तिथून बाजूला होण्यास संगितलं. या सर्व प्रकारात बराच वेळ गेल्याने ट्रेन आणि  प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. हा व्यक्ती इतका गाढ झोपला होता की ट्रेन आपल्या जवळ आली आहे, याचा त्याला अंदाजही आला नाही. 


या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक युजर्सने यावर कमेंटही केल्या आहेत. एका युजरने म्हटलंय, तो चील करतोय. तर एका युजरने म्हटलंय, त्याल माहित असावं की ट्रेन मध्ये मध्ये थांबते, रेल्वे मंत्र्यांचे आभार. 



दुसऱ्या एका व्हिडिओत चक्क एका महिलेवरुन ट्रेन गेली. ही महिला रुळ पार करत असताना कोसळली, त्याचवेळू ट्रेन आली. ट्रेनचा वेग इतका प्रचंड होता की त्या महिलेला उठून बाजूला होण्यास वेळच मिळाला नाही. सतर्कता दाखवत ही महिला रुळावरच झोपून राहिली. संपूर्ण ट्रेन तिच्यावरुन गेली. सुदैवाने या महिलेला साधं खरचटलंही नाही ही घटना तेलंगनात्लाय विकाराबाद जिल्ह्यातील नवंदगी इतली असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झालाय.