Paytm Users :  जर तुम्ही Paytm चा वापर करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. Paytm चा ग्राहकांना आता दणका बसणार आहे. जर तुम्ही Paytm वरुन क्रेडिट कार्डचं बिल (Credit Card Bill) भरत असाल तर, तुम्हाला आता भुर्दंड बसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण Paytmने आपलं वॉलेट बॅलन्समधून (Wallet Balance) बिल पेमेंट शुल्क आता महाग केलं आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डचं बिल भरणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी Paytmवरुन क्रेडिट कार्डद्वारे बिल भरल्यास कुठल्या प्रकारचे शुल्क लागत नव्हते. मात्र आता कंपनी या नियमांमध्ये बदल केला आहे. जर तुमचं क्रेडिट कार्डचं बिल 10 हजारांपेक्षा जास्त आहे तर तुम्हाला Paytm वरुन बिल भरताना 1.18% शुल्क द्यावे लागणार आहे. म्हणजे तुम्हाला 10,118 भरावे लागणार आहे. (trending news paytm users extra charge on paying paytm wallet bill through paytm wallet in marathi)


...आता हा पर्याय निवडा 


आता तुम्ही क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी पेटीएम बँक, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआयद्वारे भरा. कारण यावर कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क (Extra Charge) द्यावे लागत नाही.