PhonePe Rent Payment - गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाइन पेमेंट करण्याचं प्रमाण वाढलं आहे. लोकांना कॅश पेमेंटपेक्षा आता ऑनलाइन पेमेंट करणे सोयीस्कर वाटतं आहे. लोक आता साधे 10 रुपयेदेखील ऑनलाइन अॅपवरुन देत आहे. पेमेंट करण्यासाठी आता अनेक अॅप्सचे पर्याय आहेत. गूगल पे, PhonePe या अॅप्सवरुन लोक रोजच्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही घर भाड्यासाठी नोब्रोकर (Nobroker), रेड जिराफ  (RedGirraffe) किंवा पेटीएमचा (Paytm) वापर करता का? मग आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेलच. तर तुम्ही UPI डिजिटल पेमेंट कंपनी PhonePe द्वारे तुमच्या क्रेडिट कार्डद्वारे घराचे भाडे आता देऊ शकता. (trending news rent payment through phone app know step by step process phone pe app-using credit card in marathi)


क्रेडिट कार्डवरुन भरा भाडे आणि लाभ मिळवा


1. तुम्हाला बिल भरण्यासाठी 40 ते 50 दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळतो. 
2.  या पैशांना तुम्ही एफडीच्या रुपात जमा केल्यास तुम्हाला त्यावर व्याज मिळतो.
3. तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल नंतर  EMI मध्ये रुपांतरीत करु शकता.
4. भाडे पेमेंट केल्यावर तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट्स किंवा कॅशबॅकचा लाभ मिळतो. 


अतिरिक्त शुल्काचा बोजा


जर तुम्ही PhonePe द्वारे भाड्याच्या पेमेंट दिलं तर तुम्हाला 1.5 टक्के अतिरिक्त शुल्क भरावं लागतं. पण यावर तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. जर तुमचं भाडे 20 हजार आहे आणि तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे PhonePe अॅपवरून भाडे देणार असाल तर तुम्हाला 20300 द्यावे लागणार आहेत. 


PhonePe अॅपवर असे भरा भाडे 


1. पहिले Phone Pe उघडा
2. आता तुम्ही Recharge & Pay Billsवर क्लिक करा
3. यानंतर Utility वर क्लिक करुन Rent Payment हा पर्याय निवडा
4. त्यानंतर तुम्हाला 4 पर्याय दिसती. घर किंवा दुकानाचे भाडे, सोसायटी मेंटेनन्स, ब्रोकर पेमेंट आणि प्रॉपर्टी डिपॉझिट 
5. आता या 4 पैकी तुमच्या पर्याय निवडा
6. जर तुम्हाला घराचे भाडे भरायचे आहे, तर होम रेंटवर क्लिक करून तुम्ही घरमालकाचे बँक तपशील भरा
7. आता क्रेडिट कार्ड निवडा आणि पेमेंट करा
8. आता यापुढे तुमचे भाड्याचे पेमेंट हे PhonePe द्वारे केलं जाईल.