Air India : `सू - सू कांड` प्रकरणात धक्कादायक खुलासा, आरोपी Shankar Mishra ने दुपारच्या जेवण्यासोबत 4 Pack घेतलं आणि मग..
Air India Peeing Incident : `सू - सू कांड` प्रकरणी अखेर एक प्रत्यक्षदर्शी म्हणजे शंकर मिश्रासोबत विमानातून प्रवास करणारे सहप्रवासी समोर आली आहे. या व्यक्तीने विमानात बसल्यापासून घटना घडेपर्यंत काय काय घडलं याबद्दल खुलासा केला आहे.
Air India peeing case : गेल्या काही दिवसांपासून सू - सू कांड चांगलंच गाजतं आहे. एअर इंडिया (Air INDIA) न्यूयॉर्क दिल्ली विमानात एका व्यक्तीने महिलेवर लघुशंका केल्यानंतर एकच खळबळ माजली. त्यानंतर ही घटना ताजी असताना एअर इंडिया विमानात अजून एक सू - सू कांड (Man Pee on Woman) समोर आलं. त्यानंतर तर सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे. न्यूयॉर्क दिल्ली विमानात झालेल्या सू - सू कांड संदर्भात आरोपी शंकर मिश्राला (Shankar Mishra) अटक करण्यात आल्यानंतर त्याचाबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतं आहे. आता या प्रकरणात एक प्रत्यक्षदर्शी समोर आली आहे. तिने विमानात चढण्यापासून घटना घडेपर्यंत नेमकं काय काय झालं त्याबद्दल सांगितलं आहे.
दुपारच्या जेवण्यासोबत 4 Pack घेतलं आणि मग..
आरोपी शंकर मिश्रा याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी विमानातील दोन प्रवासी आणि क्रू मेंबर यांची चौकशी करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे
शंकर मिश्रासोबत प्रवास करणारी सहप्रवासी सुगाता भट्टाचार्य (Sugata Bhattacharya) यांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. त्यावेळी तिने अनेक धक्कादायक (Shocking) खुलासे केले आहेत. (trending news Soo Soo Scandal case Accused Shankar Mishra took 4 Pack with lunch and then Air India peeing case said co passenger marathi news)
सुगाता म्हणाल्या की, आरोपी मिश्राने दुपारच्या जेवण्यासोबत 4 Pack घेतलं होते. त्यानंतर मिश्रा यांनी क्रूला विनंती केली होती की, त्याला आणखी दारु (alcohol) देऊ नका. पण तरीदेखील त्याला अजून दारु देण्यात आलाचा अंदाज सुगाता यांनी व्यक्त केला आहे. 4 Pack घेतल्यामुळे शंकर मिश्रा हे मद्यधुंद झाला होता. तो नशेत असताना हा सू - सू कांड झाला. शंकर मिश्रा या व्यक्तीने जाणूनबुजून लघुशंका केली नाही. या घटनेपूर्वी पीडित महिलेशी वाद झाला होता का असं विचारण्यात आल्यावर सुगाता म्हणाल्या की, असं काहीही झालं नव्हतं.
धक्कादायक बाब!
महाराजा सारख्या विमानात पीडित महिलेसोबत क्रू मेंबरने चांगली वागणूक दिली नाही. पीडित महिलेला विमानात दुसरी सीट देण्यात आली नाही. शिवाय त्या सीटची साफसफाई केल्यानंतर त्यांना तिथे बसविण्यात आलं.
दरम्यान या प्रकरणाची (Crime News) सखोल तपासणी करण्यासाठी आणि सत्य उघड करण्यासाठी पोलिसांनी त्या विमानातील अजून तीन सहप्रवाशांना समन्स पाठवला आहे.
शंकर मिश्रावर विमान प्रवासाला बंदी
शंकर मिश्रा याने केलेल्या किळसवाणा प्रकरणामुळे नो प्लाई लिस्टमध्ये टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्याशिवाय त्याच्यावर 30 दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान शंकर मिश्रा हा Wells Fargo या मल्टिनॅशनल कंपनीत व्हाईस प्रेसिडंट पदावर काम करायचा. या घटनेनंतर कंपनीने त्याला कामावरुन काढून टाकलं आहे.