रब ने बना दी जोडी! उंचीसोबत विचारही जुळले, साडेतीन फूट उंच इमरान बोहल्यावर चढला
Imran Marriage story: अशीच एक कहाणी आहे ती म्हणजे इमरानची. इमरान (Imran Marriage) हा उंचीनं 3 फूट आणि 4 इंच एवढा आहे. त्याच्या घरात त्याच्यासोबत सात - आठ भावंडं आहेत परंतु त्या सगळ्यांची लग्न झाली असली तरी त्याचे लग्न मात्र काही केल्या होत नव्हते.
Viral News: लग्न म्हणजे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. अरेंज मॅरेज (Arrange Marriage) करायचं म्हटलं तर आपल्याला आपल्या अटी आणि अपेक्षाही असतात. परंतु समोरची मंडळी आपल्यातील गुणांपेक्षाही आधी आपले दोष पाहतात. मग ते कसेही असतो. अगदी जन्मजात दोष असतो वा त्यानंतरचे. शारिरीक अपंगत्व असेल तर अनेकदा लग्न होणार कसं? असा प्रश्न अनेकांना भेडसावत असतो. अशीच एक गोष्ट असते ती म्हणजे बुटक्या लोकांची. परीकथेतील कहाणी आपण स्नोव्हाईट या राजकुमारीसोबतच्या सात बुटक्यांबद्दल ऐकले असेलच परंतु प्रत्यक्षात मात्र अशांचे जगणे हे काही सोप्पे नसते. त्यामुळे त्यांना अनेक कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागते आणि त्यातीलच एक आहे आणि तो म्हणजे लग्नाचा (Bridegroom) प्रसंग (trending news three and half feet tall imram finally gets married to his bridegroom khushboo)
अशीच एक कहाणी आहे ती म्हणजे इमरानची (Imran Marriage Story). इमरान हा उंचीनं 3 फूट आणि 4 इंच एवढा आहे. त्याच्या घरात त्याच्यासोबत सात - आठ भावंडं आहेत परंतु त्या सगळ्यांची लग्न झाली असली तरी त्याचे लग्न मात्र काही केल्या होत नव्हते. त्यामुळे इमरान हा अत्यंत हताश होता. त्याच्यासाठी कोणतरी दुल्हन आहे की नाही? असा विचार करत तो रोज रडत असे परंतु त्याला त्याच्यासाठी दुल्हन काही भेटत नव्हती. त्यातून इतकी वर्षे लग्न होत नाही म्हणून इमरान निराश झाला होता. त्यातून आपल्या मित्र-मैत्रीणींची लग्न झालेली पाहून आणि आपल्या नातेवाईकांची झालेली लग्न पाहून आपलं लग्न कधी होणार याचीच प्रतिक्षा इमरान करत होता.
शेवटी त्याला खुशबू मिळाली आणि त्या दोघांचे लग्न झाले. इमरान हा आपल्या आई आणि भांवडांसोबत उत्तर प्रदेशातील पटवारी नगला येखील जीवनगड गल्ली नंबर 8 मध्ये राहतो. शेवटी त्याच्या आईला खुशबू बद्दल माहिती मिळाली आणि उंची आणि विचार खुशबू आणि इमरानचेही जुळल्यानं त्यांचे थाटात लग्न लावून देण्यात आले.
दोघंही सुखी आणि कुटुंबही आनंदात -
आपल्या उंचीमुळे इमरानचे लग्न होत नव्हते पण शेवटी त्या दोघांचेही लग्न झाले आणि ते दोघं आपल्या परिवारासोबत आता गुण्यागोविंदानं राहत आहेत. त्यांचा संसार आता खूप सुखात सुरू आहे. सतत लग्नाला उंचीमुळे नकार मिळत असताना इमरानसारखीच एक मुलगी त्याला कधी मिळणार याची प्रतिक्षा इमरानसह त्याच्या घरच्यांनाही लागली होती. त्यामुळे आता इमरानच्या लग्नावरील शुल्क काष्ट गेलं असून अख्खं कुटुंब आता गुण्यागोविंदानं राहत आहे.