Vistara Sale 2023 : पहिलं वहिलं विमान प्रवास करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे आणि तीही स्वस्ता...सर्वसामान्यांना विमानाचं तिकीट  (Ticekt Booking) विकतं घेणं म्हणजे त्यांचा खिशाला कात्री बसण्यासारखं आहे. त्यामुळे ते कधीही विमान प्रवास करण्याचा विचार करत नाही. पण प्रत्येकांचं स्वप्न असतं एकदा तरी त्याने विमान प्रवास करावा. आता हे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण टाटा समूहाची (Tata Group) एअरलाइन देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी (air travel) स्वस्त तिकीटची भन्नाट ऑफर घेऊन आली आहे.  त्यामुळे जर तुम्ही विमानाचं तिकीट बुक (Airplane ticket) करणार असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.


ही कंपनी देणार स्वस्तात विमान प्रवास 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाटा समूहाची प्रीमियम एअरलाइन विस्तारा तुमच्यासाठी जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे.  कंपनीने आपल्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त प्रवाशांसाठी ही ऑफर आणली आहे. ज्यामध्ये तुम्हाला तिकीट बूक करताना 23% सूट मिळणार आहे. 


 फक्त 4 दिवस...



या ऑफरनुसार तुम्हाला 1899 रुपयात विमान प्रवास करता येणार आहे. पण यासाठी तुमच्याकडे फक्त 4 दिवस आहेत.  12 जानेवारीपर्यंत तुम्हाला हे तिकीट बूक करायचे आहेत.  दरम्यान या विक्रीबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही अधिकृत लिंकला भेट देऊ शकता  https://bit.ly/3IFmP90 .  


या महिन्यात करता येणार प्रवास


या ऑफरनुसार तुम्हाला 23 जानेवारी 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत तिकीट बूक करु शकता. देशांतर्गत प्रवासासाठी एकेरी तिकीटाची किंमत रु. 1899  पासून सुरू होतं. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय परतीच्या तिकिटाची किंमत 13,299 रुपयांपासून सुरू होतं आहे. यासोबतच कंपनी आगाऊ सीट सिलेक्शन आणि ऍक्सेस बॅगेजवर 23 टक्के सूट देत आहे.   




टाटा समूहाची 51 टक्के हिस्सेदारी 


विस्तारा एअरलाइनमध्ये टाटा समूहाची सुमारे 51 टक्के भागीदारी आहे आणि उर्वरित 49 टक्के भागीदारी सिंगापूर एअरलाइन्स (SIA) कडे आहे. सध्या सिंगापूर एअरलाइन्सने विस्ताराचे टाटा समूहाच्या एअर इंडियामध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली होती. या करारांतर्गत 2,058.5 कोटी रुपयांची गुंतवणूकही केली जाणार आहे.