Trending News : प्रेमात काही जोडपी कोणत्याही थराला जातात. ही जोडपी तू माझ्यासाठी काय करु शकतो असं विचारल्यावर खरंच काहीही करुन बसतात. सोशल मीडियावर अशा अनेक जोडप्यांच्या विचित्र गोष्टी पाहायला मिळत असतात. या जोडप्यांमुळे आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करणाऱ्या व्यक्तीलाही अडचणीत टाकलं जातं. मी तुझ्यासाठी जे काही करतोय ते कमी आहे का असं त्या व्यक्तीला ओरडून ओरडून सांगावं लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेन तिच्या पतीचं नाव चक्क कपाळावर गोंदवून घेतलं आहे. या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून ओ माई गॉड टूरु लब असंच म्हणायची वेळ आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ कर्नाटकातल्या बंगळुरुमधील असल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडीओमध्ये महिलेने कपाळावर टॅटू काढला आहे.


माध्यमांच्या वृत्तानुसार, बंगळुरूमध्ये हे टॅटूचे दुकान आहे. 'किंग मेकर टॅटू स्टुडिओ' या दुकानाच्या नावावरच एक इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे. व्हायरल होत असेलेला हा व्हिडीओ त्याच्या वेगळेपणामुळेच व्हायरल होत आहे. कारण सहसा लोक हात, पाय, छाती, मान किंवा पाठीवर टॅटू काढतात. मात्र या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या कपाळावर टॅटू काढून घेताना दिसत आहे. 
व्हिडिओ पाहून लोक इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने हे जरा जास्तच झाले. मला डिसलाईकचे बटन दाबायला हवं, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजरने यामुळे शिक्षणाला महत्त्व आहे, असे म्हटलं आहे.


 



दरम्यान, या टॅटू पार्लरची वेबसाईट पाहिली असता वेगळीच माहिती समोर आली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी महिला त्यानंतरही अनेक व्हिडिओंमध्ये दिसली. मात्र, तेव्हा तिच्या कपाळावर एकही टॅटू दिसत नव्हता. त्यामुळे हा टॅटू तात्पुरता टॅटू होता आणि कायमस्वरूपी नव्हता असेही दावा करण्यात येत आहे.