School Teacher Dance On Sapna Choudhary Song viral video : सोशल मीडियाचं जगात कधी कुठला फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होईल सांगता येतं नाही. या इंटरनेटच्या जगात धक्कादायक, भयानक व्हिडीओ, मनोरंजन, निसर्गाचे व्हिडीओसोबत लहान मुलांचे क्यूट व्हिडीओ पाहिला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एका शाळेतील शिक्षिकेच्या डान्स व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमच्या वेळी शाळेत अशा शिक्षिका का नव्हत्या असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.  खरं तर चिमुकल्यासमोर शिक्षिकेचा असा डान्स कितपत योग्य आहे हा वेगळा प्रश्न आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक शिक्षिका लहान मुलांसमोर बोल्ड डान्स करताना दिसत आहे. (trending school teacher Bold dance on sapna choudhary front of students students video viral on Internet )


हरियाणातील प्रसिद्ध तेरी आख्या का यो काजल या सपना चौधरीच्या गाण्यावर या तरुण शिक्षिकेने डान्स केला आहे. टिचरचा अशा डान्स पाहून विद्यार्थी अवाक् झाले आहेत. शाळेतील एका वर्गात जमिनीवर बसून मुलं शिक्षिकेच्या डान्सचा आनंद लुटताना दिसत आहेत. 


तुम्ही पाहू शकता, ही शाळेतील मुलं साधारण पाचव्या सहव्या वर्गातील वाटतात. शिवाय काही मोठ्या वर्गातीलही विद्यार्थी दिसत आहेत.  काही विद्यार्थी शिक्षिकेच्या परफॉर्मन्सदरम्यान उड्या मारताना दिसत आहेत. 



हा व्हिडीओ ट्वीटरवरील HasnaZarooriHai या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी लिहिलंय की, अशी शिक्षिका आम्हाला का नव्हती??



हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. अनेक यूजर्सने आमच्या शाळेत अशी शिक्षिका का नव्हती असा प्रश्न विचारला आहे.