केदारनाथमध्ये पुन्हा एकदा भीषण हिमस्खलन, Video हादरवणारा
Avalanche Video : या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शेकडो टन बर्फाचे मोठे खंड पाहता पाहता कोसळले.
Uttarakhand Avalanche Video : आताची मोठी बातमी...केदारनाथमध्ये (kedarnath ) पुन्हा एकदा भीषण हिमस्खलन (Avalanche) झालं आहे. या भीतीदायक हिमस्खलनाचा व्हिडीओ (Avalanche Video) समोर आला आहे. चारधाम यात्रेतील महत्त्वाचे केदारनाथ मंदिराच्या अगदी मागे सुमारे 5 किलोमीटरवरच्या पर्वतीय क्षेत्रात हिमस्खलन झालं आहे. (Trending video avalanche in kedarnath Uttarakhand nm )
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शेकडो टन बर्फाचे मोठे खंड पाहता पाहता कोसळले. या हिमस्खलनामुळे केदारनाथ मंदिराचे कोणतेही नुकसान झाले नाही, अशी माहिती बद्रीनाथ ( Badrinath) केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय (Ajendra Ajay) यांनी दिली आहे.
2013 मधील कटू आठवणी जाग्या
हे हिमालयातील तेच हिमनदीचे सरोवर आहे जेव्हा 2013 मध्ये उफाळून आलं होतं. त्यावेळी हृदयद्रावक नैसर्गिक आपत्तीत 5 हजाराहून अधिक लोक मरण पावले होते. हा व्हिडीओ पाहून 2013 मधील कटू आठवणींना उजाळा मिळाला आहे.