Viral Video :आईकडूनच लेकाचा खेळ खल्लास; लेकाच्या गर्लफ्रेंडला असं काही सांगितलं की...
Viral Video : अखेर त्याने ठरवलं आता आपल्या गर्लफ्रेंडची ओळख आईशी करुन द्यायची. त्याने व्हिडीओ कॉल लावला मात्र आईने मुलाचं रहस्य उघड केलं. त्यानंतर मुलगी संतापली आणि मग...
Viral Video : सोशल मीडियावर कपलचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमधील वाद, रोमँटिक क्षण, डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. काही व्हिडीओ असे असतात जे पुन्हा पुन्हा पाहावसे वाटतात. असाच एक गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रियकर आपल्या प्रेयसीची आईची भेट करुन देत असतानाचा त्याची जी फजिती झाली, ते पाहून नेटकरी हसून लोटपोट होतं आहेत. (Trending Video boyfriend introducing girlfriend to his mother on video call mother reveals the secret of the child Video Viral on Social Media Viral News marathi Today)
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहून शकता तरुण तरुणी एका बागेत बसले आहेत. तरुणाने आपल्या प्रेयसीशी ओळख करुन द्यायचं ठरवलं. त्याने आईला व्हिडीओ कॉल लावला आणि गर्लफ्रेंडची भेट करुन दिली. पण झालं असं की, व्हिडीओ कॉल लागल्यावर तो म्हणतो हॅलो मम्मी म्हणतो. मग तो म्हणतो की मी तुला सांगितलं होतं...ही बघ तुझी भावी सून आहे. यानंतर प्रेयसीही डोकं टेकून आईळा नमस्ते आंटी म्हणते.
सुरुवातीला बोलणं छान सुरु असतं, तेव्हाच आईने तरुणीला आपल्या मुलाबद्दल असं काही सांगितलं की, प्रेयसीला धक्का बसला. मुलाने आईला विचारलं सून कशी आहे. त्यावर आईने जे उत्तर दिलं त्यानंतर तरुणीनी संतापली. आई म्हणाली की, पहिली जी दाखवली होती त्यापेक्षा ही चांगली आहे. हे ऐकून तरुणी हैराण झाली.
ती तरुणाकडे रागाने पाहिला लागली आणि नजरेतून तिने विचारलं की, ''कोण आहे ती?'' आईच्या या उत्तराने तरुणाची हवा टाइट झाली. घाबरलेला मुलगा कोणी नाही, असं लगेचच उत्तर दिलं. त्यावर तो आईला म्हणतो आई ती मस्करी का करतेस? पण प्रेयसीला त्याच्यावर संशय येतो आणि ती मुलगी कोण आहे हे ती विचारते. या सगळ्यानंतर प्रियकर लगेचच आईचा फोन ठेवून देतो...
हा मजेदार व्हिडीओ @superhumour नावाच्या एका इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. काही यूजर्सनी या व्हिडीओवर मेजदार कमेंट्सही करत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, भाऊ तुम्ही फिल्टरशिवाय फोटो दाखवला असेल, तर दुसरा म्हणतो स्मार्ट आई मर गया बेटा...