Viral Video Bride Groom :  हिंदू धर्मात लग्नाला विशेष महत्त्व आहे. आपल्या लाडक्या लेकीसाठी कसा नवरादेव असावा असं प्रत्येक आईवडील स्वप्न पाहत असतात. सुखा वाढवेलल्या लेकीसाठी ते जगातील बेस्ट जावई शोधत असतात. आज काल लव्ह मॅरेजचा जमाना आहे. अरेंज मॅरेज (Arrange marriage) असो की लव्ह मॅरेज (Love marriage) आपल्याला राणी सारखं ठेवणारा नवरा हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. त्याने आपल्यावर भरपूर प्रेम करावं, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण कराव्यात...आपल्याला निर्णय आणि जगण्याचं स्वतंत्र द्यावं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला आदर, सन्मान करावा...असाच स्वप्नातील एका राजकुमाराचा व्हिडीओ (Bride Groom Video) सोशल मीडियावर व्हायरल  (social media Video) होतं आहे. 


डोसा चटणीची लव्ह स्टोरी! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या लग्नाची कहाणी पण चित्रपटातील कहाणीला लाजवेल अशीच आहे. परदेशात तिला पाहिलं आणि पहिल्या नजरेत प्रेमात पडलो...मग लव्ह स्टोरी सुरु झाली पुढे तिची भेट कराटे क्लासला झाली. बोलणं सुरु झालं...डेटवर जायला लागलो...मी रोज नव्याने तिच्या प्रेमात पडायचो...अखेर तिला मागणी घालण्यासाठी मी भारत गाठलं.  तिला लग्नासाठी प्रपोज केलं आणि तिने हो म्हटलं. (Trending Video bride fell at the feet of the bridegroom and groom immediately fell at the feet bride love Story Video viral on social media)


ती साऊथ इंडियन बंगळुरुची कन्या...आणि मी परदेशी पाहुणा असून अशी सुरु झाली आमची डोसा चटणीची लव्ह स्टोरी...


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



भारतात हिंदू धर्मात लग्न संस्कार आणि रीतिरीवाजाला विशेष महत्त्वं आहे. या दोन लव्ह बर्डने साऊथ इंडियन पद्धतीने मंदिरात जाऊन विवाह केला. त्यानंतर नातेवाईक आणि जवळच्या मित्रमैत्रिणीच्या उपस्थितीत कृष्णाच्या साक्षीने एकमेकांचा जीवनसाथी म्हणून स्विकार केला. 



असाच नवरा हवा गं बाई!


हिंदू धर्मात नवऱ्याला देवाचं रुप मानतात. त्यामुळे हिंदू स्त्रिया या नवऱ्याचा पाया पडतात. या रीतिनुसार नववधू नवऱ्याचा पाया पडते. हे पाहून पुढच्याच क्षणी नवरदेवही वधूच्या पाया पडतो. हा सन्मान पाहून नवरीच्या डोळ्यात पाणी येतं. ती आनंदाने भारावून जाते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



खरं तर आपण एकीकडे स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करतो. पण आजही नवरा हा देव म्हणून त्याची पूजा करतो. त्याने कितीही मारलं, शिव्या दिल्या अगदी आपल्या छळ केला तरी...त्याचा दीघयुष्यासाठी उपवासही करतो. समानतेच्या गोष्टी करताना फक्त नोकरी करणे, वेस्टन कपडे घालणे म्हणजे पूरेसं आहे का?


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


महिलांना आजही समाजात तो सन्मान आणि तो मान मिळतं नाही. या तरुणांचं हे प्रेम पाहून प्रत्येक मुलीला असाच नवरा हवा गं बाई! असं नक्कीच मनोमनी म्हणतं असतील.