सादही घालतो लाडका तुला....; 75 वर्षांच्या मुलानं 100 वर्षांच्या बाबांसाठी गायलं गाणं, Video पाहून डोळ्यात येईल पाणी
या वयातही मुलगा आणि वडिलांचं अतुट नातं सांगणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून या व्हिडिओने नेटिझन्सना भावूक केलं आहे
Trending News : मुलांच्या (Children) जडणघडणीत आई-वडिलांचा (Parents) मोठा वाटा असतो. आपल्या मुलांनी मोठं व्हावं, यश मिळवावं अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. त्यातही आई आणि मुलांचं चांगलंच बॉण्डिंग असतं. वडिल काहीसे कठोर वाटत असले तरी मुलांवर त्यांचं जीवापाड प्रेम असतं. मुलगा-वडिल यांच्या नात्याचा एक सुंदर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral Videos) होत आहे. या व्हिडिओने नेटिझन्सना भावूक केलं आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. शाळेच्या कार्यक्रमात मुलगी डान्स करताना स्टेप्स विसरु नये यासाठी गर्दीत बसलेल्या तिच्या वडिलांनी डान्स केला. लोकांनी त्याला फादर ऑफ द इयर म्हटलं होतं. आता मनाला स्पर्श करणारा असणारा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओत
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक मुलगा (Son) आपल्या वडिलांसाठी (Father) गाणं गात आहे. या खास गोष्ट अशी आहे की वडिलांचं वय 100 आहे तर मुलाचं वय 75 हून अधिक आहे. व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे वय आणि प्रकृती अस्वस्थामुळे वडिल बेडवर झोपले आहेत. तर मुलगा त्यांच्याशी संवाद साधताना दिसत आहे. काही वेळाले मुलगा शिटीवर गाण्याची धून वाजवताना दिसतोय. यानंतर मुलगा वडिलांना विचारतो शिटीवर वाजवलेली धून कोणत्या गाण्याची आहे.
विशेष म्हणजे इतके वयोवृद्ध असतानाही वडिलांनी ते गाणं अचूक ओळखलं. यानंतर त्या मुलाने ते गाणं गायलं. यावेळी इतरांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. मुलगा गात असातना वडिलांच्या हातांची त्या गाण्यावर हालचाल होताना दिसतेय. सोशल मीडियावर 16 फेब्रुवारीला हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. त्यानतंर 3 हजारहून अधिकवेळा व्हडिओ रिट्विट करण्यात आला आहे.
या व्हिडिओवर लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. वडिल-मुलाच्या नातेसंबंधांचा हा सर्वात भावूक करणारा व्हिडिओ असल्याचं काही युजर्सने म्हटलं आहे. तर काही जणांनी आजच्या जमान्यात अशी नाती खूप कमी पाहिला मिळात अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलंय वडिलांसारखा दुसरा मार्गदर्शक नसतो. वडिलांच्या चांगल्या मार्गदर्शनामुळेच मुलाचे चांगले गुण पाहिला मिळतायत, असं म्हटलं आहे.