मुंबई : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed)  नेहमी तिच्या हटके स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या हटके स्टाईलचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. मात्र तिला टक्कर देणार देखील कोणी तरी आलंय अशी चर्चा आता सोशल मीडियावर सुरु झाली आहे. कारण एका तरूणीच्या हटके स्टाईलचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नेमकं काय आहे हे जाणून घेऊय़ात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात टॅलेंटची कमी आहे. याच मुख्य उदाहरण तुम्हाला इन्स्टाग्रामवर (Instagram) पाहायला मिळेल.अनेक तरूण-तरूणी सध्या व्हिडिओ कटेंट बनवून प्रसिद्धी झोतात येतायत आणि लाखो रूपये कमवत आहे.अशीच एक तरूणी आता प्रसिद्धी झोतात आली आहे. तिच्या हटके स्टाईलमुळे ही तरूणी चर्चेत आली आहे. तिने नेमकी अशी कोणती स्टाईल केलीय ती पाहूयात. 


व्हिडिओत काय? 


व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (viral video) तुम्ही पाहू शकता, तरूणी कॅमेरासमोर एक दोनदा लेसच पॅकेट दाखवते. हे पॅकेट दाखवता दाखवता अचानक तिचा लुक बदलतो. यामध्ये ती लेसच्या रॅपरपासून बनलेली साडी परीधान (Weird Saree Video) केलेली दिसतेय. आपण अनेकदा लेस खाल्यावर ते फेकून देतो, मात्र हिने ते पॅकेट फेकून न देता त्याची साडी बनवली आहे. ही साडी बनवल्यानंतर तिने ती परीधान देखील केली आहे.  


हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी यावर भन्नाट कमेंट करत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘साड़ी हो तो ऐसी हो वरना ना हो.’ त्याचवेळी एक महिला यूझरने लिहले की, मी साडीप्रेमी आहे आणि मला ते अजिबात आवडले नाही. कला आणि सर्जनशीलतेच्या नावाखाली लोक काहीही करत असतात,असे तिने म्हटले. तर एका यूझरने मॅडम तुम्ही साडी बनवली आहे, पण ती नेसून कुठे फिरणार?  असा सवालच केला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by BeBadass.in (@bebadass.in)


bebadass.in या अकाऊंटवरू हा व्हिडिओ अपलोड (Weird Saree Video) करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. काहींना हा व्हिडिओ प्रचंड आवडला आहे, तर काहींना हा व्हिडिओ पचला देखील नाही आहे.