Trending Video : प्रत्येक प्रेमी युगुलाला (loving couple) वाटतं आपल्या प्रेमाला लग्नाची मान्यता मिळावी. मुलींसाठी त्यांचा जीवनसाथी आणि लग्नाबद्दल खूप स्वप्न असतात. त्यामुळे प्रत्येक प्रेयसी (girlfriend) आपल्या प्रियकराकडे ( boyfriend) कायम लग्नाविषयी बोलतं असते. एका तरुणीने तरुणाला लग्नाबद्दल (marriage) विचारलं असता तरुणाने जे काही केलं त्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Video viral social media)व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून संताप होतो. 


निर्दयीपणाचा कळस!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियकराला लग्नाविषयी विचारणे हा काय गुन्हा आहे का? खरं तर या पुरुषांना कोणी परवानगी दिली अशाप्रकारे महिलेला मारायची? प्रेयसीची बस्स एवढंच चूक होती की तिला त्या प्रियकरासोबत लग्न करायचं होतं. या एका स्वप्नासाठी तिला इतक्या निर्दयीपणे मारहाण (Girlfriend Beaten)...अंगावर काटा येतो हा व्हिडिओ पाहून... या घटनेचा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. राग जेव्हा अजून अनावर होतो जेव्हा हा व्हिडिओ बनवणारा व्यक्ती तिची मदत न करता व्हिडिओ काढतं होता. (Trending Video girlfriend asking boyfriend marry me but boy beat up girl madhya pradesh news viral on Social media)



प्रेयसीला बेदम मारहाण


जसं तिने लग्नासाठी विचारलं त्या प्रियकराने (lover) चक्क प्रेयसीला (beloved) बेदम मारहाण करायला सुरुवात केली. तिच्या कानाखाली मारली, नंतर तिचे केस ओढून जमिनीवर पाडले त्यानंतर अंगावर चेहऱ्यावर लाथाबुक्क्यांनी मारलं. अमानुष प्रकारे या तरुणाने तिला मारहाण केल्यामुळे ती बेशुद्ध पडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता प्रियकर आणि प्रेयसी एका निर्जन ठिकाणी आहे. या व्हिडिओमध्ये ऐकू येतं आहे की, तरुण व्हिडिओ बनवण्यास सांगत आहे. शिवाय तरुणी लग्नासाठी विचारतानाही दिसतं आहे. 


कुठली आहे घटना?



हा धक्कादायक व्हिडिओ मध्य प्रदेशातील (madhya pradesh news) रीवा जिल्ह्यातील मौगंजमधील आहे. व्हिडिओमधील नराधमाचं नाव पंकज असून सध्या तो फरार आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपी पंकजला तंबी देऊन सोडलं होतं. त्यांना वाटलं प्रियकर आणि प्रेयसीमधील किरकोळ वाद आहे.



पण जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर पोलिसांना त्या घटनेचं गांभीर्य समजलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणावर भादंवि कलम 323 सह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र पंकज फरार झाला कारण व्हिडिओ व्हायरल होईपर्यंत उशीर झाला होता. दरम्यान व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.