Bride Groom Trending Video : लग्न (wedding Video) ...त्यासाठी संबंधित विधी...लग्नाचा सोहळा, वधू वराचा थाट...वऱ्हाडी मंडळी...फोटोग्राफर सगळीकडे एकच उत्साह...लग्नाचा हा दिवस कायम स्मरणात राहावा म्हणून आजकाल अनेक भन्नाट आयडिया शोधून काढल्या जातात. गेल्या काही वर्षांपासून प्री वेडींग फोटोशूट (Pre wedding photo shoot) आणि व्हिडीओचं (Pre wedding Video) फाड आलं आहे. यासगळ्यामागे एकच उद्देश असतो तो म्हणजे लग्नातील प्रत्येक क्षण हा अस्मरणीय असावा. पण काही वेळा आपल्या न कळतं अशा गोष्टी घडतात की ती घटना वर्षांनुवर्ष लक्षात राहते. ती घटना लग्नातील एक किस्सा म्हणून कायम सांगितली जाते. असाच एका लग्नातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतो आहे. 


लग्नमंडपात राडा!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता वधू - वर (Bride Groom Video) मंडपात बसले आहेत. त्यात एक विधी (wedding rituals) केला जात आहे. ज्यामध्ये वधू आणि वरच्या डोक्यावरुन दोन व्यक्तीने पांढऱ्या रंगाची चादर धरली आहे. या चादरीवर तांदूळ ठेवण्यात आले आहेत. आता विधीनुसार या चादरीतील तांदूळ तीन वेळा वर फेकायचे आहेत. तिसऱ्यांदा तांदूळ हवेत केल्यानंतर ती चादर दोन्ही बाजूने ओढायला सुरुवात होते. या गोंधळात वरच्या बाजूने उभा असलेला व्यक्ती वर आणि वधूच्या अंगावर पडतो. (Trending Video man fell on Viral on Bride Groom in wedding see what happens next viral on Social media)



ही रस्सीखेच पाहून लग्नातील वऱ्हाडी अवाक् झाले आहेत. भारतात अनेक धर्म, जातीचे लोक राहतात. त्यामुळे लग्नाचे विविध आणि विचित्र प्रथा असतात. अशीच ही एका लग्नातील विचित्र प्रथा वधू वरच्या जीवावर बेतली.  अवघ्या काही सेकंदांच्या व्हिडीओने नेटकरी हैराण झाले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर हा व्हिडीओ पाहून बरेच लोकांनी या विचित्र प्रथेवर नाराजी व्यक्त केली आहे.