Trending Video : सोशल मीडिया रोज वेगवेगळा ट्रेंड (Social media trends) असतो. सध्या सोशल मीडियावर ‘पतली कमरिया मोरी आय… हाय… हाय…तिरछी नजरिया बोले हाय… हाय…’ (patli kamaria mori) या गाणाने वेड लावलं आहे. या गाण्यावर सोशल मीडियावर आपल्या जो तो डान्स (Dance video) करताना दिसतो. या गाण्याचे अनेक रील्स पाहिला मिळतात. या गाण्याची जादूने अनेकांना पछाडलं आहे. अगदी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar video) हिनेदेखील या गाण्यावर कंबर थिरकवली आहे. या गाण्याच्या मोहातून कोणीही स्वत: ला वाचवू शकला नाही आहे.  या गाण्याचा क्रेझ एवढा आहे की, एक महिला शिक्षिकादेखील या गाण्यावर थिरकली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 


भन्नाट व्हिडीओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘पतली कमरिया मोरी आय… हाय… हाय…तिरछी नजरिया बोले हाय… हाय…’ या गाण्याची क्रेझ 2023मध्येही दिसून येतं आहे.  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला शिक्षिक साडीमध्ये लहान मुलांसोबत या गाण्यावर डान्स करत आहेत. विशेष म्हणजे या शिक्षेकेला या चिमुरड्यांनी व्हिडीओ बनविण्यासाठी छान साथ दिली आहे. या शिक्षेकेचा आणि मुलांचा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  शिक्षिका जेव्हा कंबर हलवते तेव्हा वर्गातील चिमुरडी टीचरकडे बघून फ्लाईंग किस देतात. (Trending Video patli kamaria mori female teacher hot and bold Dance in classroom Viral on Social media)


कधीचा आहे हा व्हिडीओ? 


हा व्हिडीओ ख्रिसमसच्या दरम्यानचा दिसतोय. कारण या व्हिडीओमध्ये वर्गातील विद्यार्थ्यांनी डोक्यावर सांताक्लॉजच्या टोप्या घातल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंन्स्टाग्रामवरील (Instagram video) alisha_catherine_24 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.



या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स येतं आहेत. 'काश आमच्या जन्मात पण अशी शिक्षिका असती तर, तुम्ही लकी आहात.' अशी कमेंट एका यूजरने केली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आपली वर्गशिक्षेका आठवत आहे.