Trending Video  :  गेल्या काही दिवसांपासून एअर इंडियामधील सू सू कांड चांगलंच गाजतंय. त्यानंतर विमानातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. कुठल्या विमानात प्रवाशांची मारामारी असो, किंवा एका तरुणाने हवेत तरुणीला विमानात प्रपोज करणं असो, असे अनेक व्हिडीओ गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण आता सध्या सोशल मीडियावर धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका पठ्ठाने राव कमालच केली आहे. गुटखा खाण्याची तलप इतकी की त्याने विमान जमिनीवर उतरण्याची वाटही पाहिली नाही. असं आहे ना राव गुटखा खाल्ला की तो थुंकावा लागतो. पण विमानातील खिडक्या बंद असतात मग झाली ना या साहेबांची पंचाईत...


आणि त्याने विमानाची खिडकी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुण हातामध्ये गुटखा चोळत असतो. अशात तो एअर एअर होस्टेसला बोलवतो आणि म्हणतो, 'विमानाची खिडकी उघडणार का, गुटखा खाऊन थुंकायचं आहे. ' हे ऐकता क्षणीत एअर होस्टेसपासून विमानातील सहप्रवासी हक्काबुक्का होतात. या प्रवाशाची ही अजब मागणी ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो. 


मजेदार व्हिडीओ


खरं तर हा सगळा एक गंमतीचा भाग होता. त्या तरुणाची मागणी ऐकताच एअर होस्टेसपासून सगळे जण हसायला लागतात. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पण हसू आवरु शकणार नाहीत. हा मजेदार व्हिडीओ videonation.teb या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.  विमानातील आजपर्यंत अनेक किस्से आपण ऐकले आहेत किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले आहेत. पण हा व्हिडीओ पाहून तर नेटकरी हसून लोटपोट झाले आहेत.



उंच आकाशात विमान उडतं असताना या प्रवाशाची अनोखी मागणी नेटकऱ्यांना हसण्यास मजबूर करतं आहेत.  गुटख्याची तलप काय असते हे तर गुटखा खाणाऱ्याच सांगू शकतो. पण तरुणाने हा व्हिडीओ नक्कीच सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी तयार केलाला एक रील असल्याचं जाणवतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ? 




या व्हिडीओला सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळतं आहे तर हजारो कंमेंट्सचा पाऊस पडत आहे. सोशल मीडियावर रील्स वेड दिवसेंदिवस वाढतं आहेत. त्यात असे असंख्य मजेदार व्हिडीओ आपल्याला पाहिला मिळतात.