Chhattisgarh Viral Video : एका खळबळजनक व्हिडिओने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे. एक व्यक्ती एका अल्पवयीन मुलीचे केस पकडून तिला धारदार शस्त्राचा धाक दाखवत रस्त्यावरुन ओढत घेऊ जाताना दिसतं आहे.  हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. लोकांमध्ये पोलिसांचा धाक एवढा कसा उडाला आहे की गुन्हेगारांचं मनोधैर्य उंचावले आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Trending Video)


काय घडलं नेमकं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर हा व्हिडिओ रायपूरच्या गुडयारी भागातील आहे. शनिवारी रात्री एक तरुण एका अल्पवयीन मुलीचे केस ओढत रस्त्यावरून जात होता. मुलीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग दिसत होते आणि त्या नराधमाच्या हातात धारदार शस्त्र होते. विक्षिप्तपणाचे हे कृत्य शहरातील लोक पाहत होते, पण कोणी मदतीला जात नव्हते. कारण लोक घाबरल होती तो नराधम त्या मुलीला आणि आपल्याला काही करणार तर नाही ना...(Trending Video Pulling the hair of a minor girl while showing fear of weapons the reason will be shocking Chhattisgarh Viral Video on Social media)


कारण ऐकून बसेल धक्का


या नराधमाने एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केलं. त्या मुलीने लग्नासाठी नकार दिला म्हणून त्याने तिला मारहाण केली. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान पीडित मुलीच्या कुटुंबियांनी आरोपीबद्दल पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलीस नराधमाच्या घरी गेल्यावर त्याने नवीन नाटक केलं. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो घराच्या छतावर गेला आणि स्वत:वर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याची धमकी दिली. अथक परिश्रमानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. 




ओंकार तिवारी असं नराधमाचं नाव आहे. ओंकार तिवारीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुडैरी पोलिसांनी सांगितले की, कलम 307 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. रायपूरमधील मतराणी चौकात किशनलाल यांच्या घरासमोरील रस्त्यावर ही घटना घडली.