VIDEO : बहीण प्रियंकाला मिठी मारून Kiss, राहुल गांधी यांच्या त्या व्हिडीओवरुन नव्या वाद
Trending Video : भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी वेगवेगळ्या गोष्टींमुळे कायम चर्चेत आहेत. या यात्रेदरम्यान बहीण प्रियंका गांधी वाड्रा यांना स्टेजवर असंख्य लोकांसमोर मिठीत घेऊन चुंबन घेतलं. त्यानंतर नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
Rahul Gandhi Hugs & Kisses Priyanka Gandhi : भारत जोडो यात्रेतील काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे अनेक व्हिडीओ (social media Video) सोशल मीडियावर व्हायरल (viral Video) झाले. त्यातील अनेक व्हिडीओ हे कधी या महिलेचा हात धरला तर कधी त्या महिलेसोबत असा फोटो काढला म्हणून व्हायरल झाला. पण आता राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) अजून एका व्हिडीओनंतर नवीन वादाला तोंड फुटलं आहे. या व्हिडीओमध्ये बहीण प्रियांका गांधी वाड्राला (Priyanka Gandhi) त्यांनी स्टेजवर घट्ट मिठी मारली. एवढंच नाही तर प्रियंका यांच्या गालाचं चुंबन घेतलं. अनेक दिवसांनी बहिणीला भेटल्याचा आनंद यात दिसतं होता. पण बहिण भावामधील हे प्रेम काही लोकांना खटकलं आहे.
योगी आदित्यनाथ सरकारमधील नेत्याची टीका
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारमधील दिनेश प्रताप सिंह (dinesh pratap singh) यांनी गांधी कुटुंबियांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ''राहुल गांधी यांना भारतीय संस्कृती समजणार नाही. कुणी आपल्या बहिणीचं अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेतं का? कोणता भारतीय व्यक्ती असं कृत्य करेल?''
याशिवाय ''त्यांचे पूर्वज हे धोतर आणि कुर्तामध्ये यात्रा काढायचे आणि राहुल गांधी टी - शर्ट घालून यात्रा काढता, हे किती योग्य आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. (Trending Video Rahul Gandhi Hugs & Kisses To His Sister Priyanka Gandhi During Bharat Jodo Yatra viral on Social media marathi news)
राहुल गांधींचं हे वागणं योग्य आहे का?
भारतासारख्या देशात बहिणीला आईचं स्थान आहे. त्यामुळे बहिणीशी अशाप्रकारे शारीरिक स्पर्श आजही काही लोकांना मान्य नाहीत. यामध्येही जुनी आणि नविन पिढीमध्ये वाद होतो. बहीणबद्दलचं प्रेम व्यक्त करताना राहुल गांधी सार्वजनिक ठिकाणी चुकले का? मग असा प्रश्न निर्माण होतो. एक राजकारणी म्हणून त्यांचं समाजासमोर असं कृत्य हे कितपत बरोबर आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या या कृत्यामुळे ते नव्या वादात अडकले आहेत. त्या समाजातील एक व्यक्ती म्हणून तुमचं यावर काय मतं आहे.