Trending Video : शाळा आणि कॉलेजचे दिवस (School and college days) हे आयुष्यातील सगळ्यात चांगले दिवस असतात, बरोबर ना...कोरोना महासंकटात दोन वर्षांत जेव्हा आपण घरात बंदिस्त होतो त्यावेळी अनेकांनी मोबाईलवरील व्हाटस्अपद्वारे (WhatsApp) जुन्या आठवणीना उजाळा दिला. पूर्वीच्या काळात आजच्या प्रमाणात मोबाईल (Mobiles), कॅमेरे (cameras) तेव्हा नव्हते. त्यामुळे अनेक आठवणी या मनात आहेत. कधी तरी शाळा, कॉलजेचा ग्रुप भेटला की आपण त्या आठवणींवरुन हसून लोटपोट होतो.पण आजकाल प्रत्येक क्षण हा कॅमेऱ्यात कैद केला जातो. सध्या अनेक शाळा, कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुरु आहेत. असाच एका सांस्कृतिक कार्यक्रमातील महिला शिक्षिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Video viral on social media) नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 


उत्साहाच्या भरात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुरु आहे. स्टेजवर काही मुली राजस्थानी पोशाखात डान्स करत असतात. अचानक हिरवी साडी नेसलेली एक महिला शिक्षिका उत्साहाच्या भरात स्टेजच्या समोर येतं आणि मग काय ती चक्क डान्स करु लागते. तिला डान्स करताना पाहून अजून एक शिक्षिका येऊन तिला साथ देते. या दोन मॅडम विद्यार्थ्यांना डान्स करताना पाहून स्वत:ला रोखू शकल्या नाहीत. त्यांचा डान्स पाहून विद्यार्थ्यांनीही ओरडायला आणि टाळ्या वाजवायला सुरुवात केली. (Trending Video Seeing the students dancing Madam got out of control school function Viral on Social media )


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


थोडं कौतुक थोडं ट्रोल!


मॅडमचा हा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही यूजर्सने त्यांचा डान्सचं कौतुक केलं आहे तर काही नेटकऱ्यांनी या दोन मॅडमला ट्रोल केलं आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रावर  yourfunzone नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. मॅडमचे डान्स स्टेप्स पाहून तुम्ही पण अवाक् व्हाल.