Viral Video Peru : सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (video Viral) होत असतात. यातील काही व्हिडिओ हे खुपच मनोरंजक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत नाचता नाचता काही विद्यार्थी जमीनीत खचले गेल्याची घटना घडलीय. या घटनेत किती जणांचा मृत्यू झाला आहे व किती जण जखमी झाले आहेत, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही आहे. मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


व्हिडिओत काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता विद्यार्थी पार्टी करत आहेत. हे विद्यार्थी ग्रॅज्यूएशन पार्टी दरम्यान तुफान सेलिब्रेशन करत आहे. या सेलिब्रेशनमध्ये ते तुफान नाचत गाजत आहेत. असेच सेलिब्रेशन सुरु असताना विद्यार्थी बेभान होऊन नाचत होते, यावेळेस अचानक जमीन खचते. आणि विद्यार्थी नाचत असलेल्या जमीनीला भेग पडून खचले जातात. या सोबत विद्यार्थी देखील जमीनीत खचले जातात. साधारण 25 एक विद्यार्थी या जमीनीत खचतात. या सेलिब्रेशनच्या व्हिडिओ बनवणाऱ्या कॅमेरात ही घटना कैद झाली आहे. हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. 


विद्यार्थी जखमी


या घटनेत अनेक विद्यार्थी नाचत होते. त्यापैकी 25 विद्यार्थी जमीनीसह खचले गेले. अनेक विद्यार्थी ख़ड्ड्यात पडले आहेत, तुम्ही व्हिडिओत (video Viral)पाहू शकता. हे विद्यार्थी खचलेल्या जमीनीत पडले आहेत. हे विद्यार्थी या खड्ड्यातून वर येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान या घटनेत किती लोक जखमी झाले आहेत, याची अद्याप माहिती मिळू शकली नाही आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पेरूच्या सॅन मार्टिनची आहे. इथे 25 हून अधिक विद्यार्थी उड्या मारून नाचत पदवीचा आनंद साजरा करत होते. पण ग्रॅज्युएशन पार्टीदरम्यान जमीन खचल्याने 25 विद्यार्थी नाचत असतानाच जमिनीत सामावले आहेत. या घटनेचा व्हिडिओ (video Viral) pop_o_clock नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच हा व्हिडिओ शेअर करत त्याने नागरीकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.



दरम्यान हा व्हिडिओ (video Viral) सोशल मीडिय़ावर (Social media) प्रचंड व्हायरल होत आहे.आतापर्यंत या व्हिडिओला 28 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तर लाखो व्ह्यूज आले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत. "मला मनापासून आशा आहे की कोणालाही दुखापत झाली नसावी. या सर्व तरुणांसाठी हा अतिशय भयानक अनुभव आहे,असे एका यूजरने म्हटलेय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.