Viral Video : सन ऑफ बिहार या नावाने प्रसिद्ध असलेला पत्रकार मनीष कश्यपबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. त्यांचा निर्भीड पत्रकारितेमुळे त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बिहारमधील भ्रष्टाचारा पोलखोल त्याने जगासमोर आणली. सध्या सोशल मीडियावर अशाच एका भ्रष्टाचारबद्दल चर्चा सुरु आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आर्श्चय वाटेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर एका लहान मुलाच्या रिपोर्टिंगची जोरदार चर्चा सुरु आहे. या मुलाने मनीष कश्यपप्रमाणे रिपोर्टिंग केली आहे. मनीषने बिहारमधील भ्रष्टाचार जनतेसमोर आणला होता. तर या छोट्या मनीषने सरकारी शाळेची दुर्दशा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 


या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकतो तो पहिले वर्गात जातो. या वर्गात कोणी नाही तर फर्त दोन-चार खुर्च्या आहेत. तो या वर्गात आल्यावर शिक्षकाचा शोध घेतो. शिक्षण न दिसल्यामुळे हा मुलगा बिहारी स्टाइलमध्ये सरकारी शाळेच्या दुरवस्थेबद्दल टोमणा मारतो. त्यानंतर तिथे असलेल्या एका मुलांशी त्याने बोलण्याचा प्रयत्न केला पण तो काही बोलत नाही. 


यानंतर हा छोटा रिपोर्टर वळतो शाळेतील टॉयलेटकडे. या टॉलेटची दुर्दशा पाहून किळसपणा वाटतो. त्यानंतर तो मुलींच्या टॉयलेटकडे लक्ष वेधतो. ज्याची अवस्था अतिशय खराब आहे. नंतर त्याने शाळेतील हातपंपाची अवस्था दाखवली. बोअरवेल पाइपलाइन आहे पण हातपंप गायब आहे. या शाळेत मुलं शिकत असताना त्यांना किती त्रास होतो याबद्दल त्याने आपल्या रिपोर्टिंगमधून दाखविण्याचा प्रयत्न केला. हा छोटा रिपोर्टर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.  


हा व्हिडीओ Utkarsh Singh यांनी आपल्या ट्वीट अकाउंटवर शेअर केला आहे. Utkarsh Singh यांनी कॅप्शन दिलं आहे की, हेतू चांगला असला तर माइक नसतानाही रिपोर्टिंग करुन सत्य दाखवता येतं. आतापर्यंत हा व्हिडीओ 4 लाख 50 हजारांहून अधिक यूजर्सने पाहिला आहे. तर 27 हजार लोकांनी तो लाइक केला आहे. हा व्हिडीओ पाहून यातील छोट्या पत्रकाराचं तोंडभरून कौतुक करण्यात येत आहे.