Viral News : सोशल मीडिआवर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. काही व्हिडिओ हे खुप मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तरूणाने राष्ट्रध्वजाचा अपमान (national flag) केल्याची घटना घडली आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.


व्हिडिओत काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रॅक पँट आणि टी-शर्ट घातलेल्या तरुण हातात तिरंगा (national flag) पकडलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो तिरंग्याने चेहरा आणि मानेचा घाम पुसताना दिसत आहे. यावेळी तरूण बराच वेळ राष्ट्रध्वजाने तोंड आणि गळा पुसतो आणि स्वच्छ करतो. यानंतर तो तिरंगा (national flag) जमीनीवर खाली फेकतानाही दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक जण संताप व्यक्त करत आहेत. 


घटना कुठे घडलीय? 


उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत तरूणाने राष्ट्रध्वजाने (national flag) तोंड आणि गळा साफ केला आणि नंतर राष्ट्रध्वज खाली फेकला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये आरोपी तिरंग्याचा अपमान करताना दिसत आहे. या घटनेत आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.



ग्रामीण अतिरिक्त पोलीस अधीक्षक सिद्धार्थ वर्मा यांनी सांगितले की, आरोपी बदायूमधील झरीफ नगरच्या ढेल गावचा रहिवासी आहे. राष्ट्रध्वजाचा (national flag) अनादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल (case file) केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.


दरम्यान तरूणाने राष्ट्रध्वजाचा (national flag) अपमान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी संताप व्यक्त करून त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करतायत.