Viral Video : जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही असं वारंवार सांगण्यात येतं. तरीदेखील अनेक जण आपल्या जीव धोक्यात घालतात. सोशल मीडियाच्या (Social media) जगात प्रसिद्ध होण्यासाठी अनेक यूजर्स (Users) खतरनाक स्टंट (Dangerous stunts) करताना दिसतात. तर काही लोक रोजच्या धकाधकीच्या जीवनात काही तरी असं करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात. रेल्वे रुळ (Railway track) ओलांडू नका, जर रेड सिग्नल (Red signal) असल्यास रस्ता ओलांडू नका असं सतत सांगितलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रेल्वे (Indian Railways) स्टेशनवर धावती ट्रेन (running train) पकडू नका, त्यातून उतरु नका, असे अनेक घोषणा स्टेशनवर केल्या जातात. पण प्रवासी काही केल्या ऐकत नाही. स्टेशनवर अनेक सुरक्षाकर्मी अशा प्रवाशांवर नजर ठेवण्यासाठी तैनात केले असतात. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना भारतीय रेल्वेकडून दंडही ठोठवला जातो तरीदेखील प्रवासी आपला जीव धोक्यात घालतात. 


धक्कादायक व्हिडिओ


सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला धावत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर (platform video) उडी मारते. ही घटना लक्षात येतात, प्लॅटफॉर्मवर  रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) जवान तिच्या मदतीला जातो. त्या महिलेने प्लॅटफॉर्मवर उडी मारल्यानंतर ती बेशुद्ध पडली, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. त्या महिलेला उपचारासाठी स्थानकावरील वैद्यकीय मदत कक्षात भरती करण्यात आलं होतं. त्या महिलेच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. (Trending Video woman jumps on running train on platform viral on Social media)


कुठे घडली ही घटना ?


रतलाम (Ratlam) रेल्वे स्थानकावर ही घटना घडली आहे. सागर बाई असं महिलेचं नाव असून ती 65 वर्षाची आहे. त्या महिलेला नागदा स्टेशनसाठी ट्रेनमध्ये चढायचं होतं पण ती चुकून एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट ट्रेनमध्ये (Ernakulam-Hazrat Nizamuddin Superfast Train) चढली. ही गोष्ट तिच्या लक्षात येताच तिने धावत्या ट्रेनमधून उडी मारली. 



धावत्या ट्रेनमधून तरुण खाली पडला अन्


अशाच एक धक्कादायक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. ज्यात एक तरुण धावत्या ट्रेन पडकल्याला जातो आणि...तो ट्रेनच्या दरवाज्यालाच लटकतो. त्याचं नशीब चांगलं होतं म्हणून रेल्वे प्लॅटफॉर्मवर जीआरपी जवानने तिचा जीव वाचविला. त्या तरुणाला वाचविताना ते दोघेही प्लॅटफॉर्मवर (Railway Platform) पडले थोडक्यात या दोघांचा जीव वाचला आहे. प्रवासी घाईगडबडीत ट्रेन पकडायला जातात आणि स्वत:सोबतच इतरांचाही जीव धोक्यात घालतात.