Bride Metro to Reach Wedding Trending Video : मुंबई आणि ट्रॅफिक (Mumbai Traffic Updates) जणू काही हे समीकरणचं ठरलं आहे. अनेकांचे या वाहतूक कोंडीमुळे महत्त्वाचा वेळा चुकल्या आहेत. कोणाची ट्रेन (Mumbai Local Trains) सुटली आहे तर कोणाचं विमान उडालं आहे. असे प्रसंग अनेकांच्या आयुष्यात कधी ना कधी आले आहेत. अनेकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. त्यांची कारणं वेगवेगळी असेल पण अनेकांचं यामुळे नुकसानही झालं आहे. जर आपण वेळेत पोहू शकतं नसेल तर आपली चिडचिड होते. मग जर आपलं लग्न (Wedding Video) आहे आणि मंडपात नवरीला (Bride Video) मंडपात आणा असं पंडीत सांगतात. मग अशावेळी ती नवरी ट्रॅफिकमध्ये अडकली असेल तर काय करायचं...  


इकडे ट्रॅफिक तिकडे मुहूर्त!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या एक नवरीबाई सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. कारण जेव्हा ही नवरी ट्रॅफिकमध्ये अडकते तेव्हा तिचा जीव कासावसी होतो. वऱ्हाडी पण टेन्शनमध्ये असतात...वधू मंडपात नाही नवरदेव नवरीची आतुरतेने वाट पाहतं असतो. मग अशावेळी नवरीने लग्नाचा मुहू्र्त हुकू नये म्हणून एक शक्कल लढवली. नवरीची ही आयडिया पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. (Trending vidoe bride stucked in traffic than reached the wedding by metro bengaluru bride viral on Social media )


नवरीबाईने गाठली Metro


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकतं सुंदर सील्कची जरीकाठची साडी, साऊथ इंडियन दागिनी आणि लाजच मुरडत नवरी जरा टेन्शनमध्ये दिसतं आहे. कारण विवाह कार्यालयात तिची वाट पाहिली जाते आहे. ही नवरी ट्रॅफिकमध्ये अडकली होती. अखेर तिने या वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी थेट मेट्रोच गाठली...हो नवरीबाईची वरात मेट्रोमधून निघाली. नवरीला पाहून मेट्रो स्टेशनवरील प्रवासी पण थक्क झाले. पण तिने कसलाही विचार न करता मेट्रोतून प्रवास करुन वेडिंग हॉल गाठलं. तिच्या या निर्णयामुळे ती विवाह मंडपात वेळेत पोहोचली आणि तिने लग्नाचा मुहूर्त चुकू दिला नाही. 



कुठला आहे हा व्हिडीओ


हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. हा व्हिडीओ @ForeverBLRU ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. ही वधू बंगळुरुची आहे. तिच्या या निर्णयाचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.