Snake Viral Video: आपण पाहतो सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, सध्या एक व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे, जो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. साप म्हटलं की, सर्वांची भंबेरी उडते. गावात खेड्यापाड्यात जंगलात साप वरचेवर दिसत असतात. साप आपल्या घरात येऊ नये म्हणून गावाकडील लोक अनेक उपाययोजना करत असतात. 


आणखी वाचा: snake: घराच्या गेटवर 'हे' फळ टांगून ठेवल्याने साप घरात प्रवेश करत नाहीत. साप लांबूनच पळून जातात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण जो व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral trending video on social media ) होत आहे त्यात जे घडलाय त्यावर तुमचा विश्वासही बसणार नाही. 


महिलेच्या बॅगमध्ये चक्क सापडलाय साप !  आणि महत्वाचं म्हणजे चक्क विमानतळावर बॅग स्कॅनिंग साठी देत असताना बागेत साप असल्याचं समोर आलं आणि सर्वत्र खळबळ उडाली.हा संपूर्ण प्रकार घडलाय अमेरिकेच्या टाम्पा आंतराष्ट्रीय विमानतळावर. बॅग स्कॅन करत असताना सुरक्षारक्षकांना चार फुटी साप दिसला आणि एकच धावपळ सुरु झाली.  (found snake in checkin bag on airport)


एकूण प्रकार पाहता हा सर्व प्रकार गंभीर आहे कारणं इतर प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत गंभीर आहे. 


साप बॅगेत आलाच कसा ?


टीसीएने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या टाम्पा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा रक्षकांनी अश्या एका महिलेला अडवले जिच्या बॅगेत त्यांना 4 फुटी साप विळखा घालून बसलेला दिसला. हा व्हिडीओ ट्रान्सपोर्टेशन सिक्योरिटी एडमिनिस्ट्रेशनने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात सुरक्षा रक्षक तपासणी करताना एक्स रे मशीनमध्ये जे दिसलं त्याचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.


आणखी वाचा:  ITR Refund 2022 : ITR भरून झालाय, आता रिफंड कधी आणि कसा मिळणार, जाणून घ्या एका क्लिकवर


सुरक्षा रक्षकांनी तपासणी दरम्यान केलेल्या एक्स रे फोटोचा व्हिडीओ शेअर केलेला आहे. बॅगेत बूट, लॅपटॉप आणि अन्य सामानसह मोठा सापही असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. महिलेच्या बॅगेत भला मोठा मांडूळ साप सापडल्याची माहिती समोर आली आहे. मांडूळ साप हा बिनविषारी साप असून तो शरीराला घट्ट विळखा घालून इतर प्राण्यांची शिकार करत असतो.