Viral Video : देशभरात लग्नाचा माहोल सूरू आहे. अनेक तरूण-तरूणी लग्नबंधनात (wedding) अडकतायत. सोशल मीडियावरही (Social media) लग्नाचा फिव्हर दिसून येत आहे. कारण सोशल मीडियावर अनेक लग्नाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.या व्हिडिओत नवरीकडचे मंडळी अनोख्या पद्धतीने नवऱ्याचे स्वागत करताना दिसत आहे. नवरीकडच्यांची ही पद्धत पाहुन तुम्हाला देखील धक्का बसणार आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नाचा एक व्हिडिओ ( Marriage Video)सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नवरीचे आई-वडील नवऱ्याला सिगारेट (cigarette) ओढायला देत, त्याचे अनोख्या पद्धतीने स्वागत करताना दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.


व्हिडिओत काय? 


व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरा मुलगा सोफ्यावर बसला आहे.आणि त्याचे होणारे सासू -सासरे हातात सिगारेट आणि माचीस पकडून आहेत. काही वेळानंतर हे सासू-सासरे नवऱ्या मुलाच्या तोंडात सिगारेट (cigarette) टाकतात आणि माचिसने ते पेटवतात. मात्र ते पेटवण्याची फक्त अॅक्शन करतात, सिगारेट पेटवत नाही. त्यानंतर माचिस विझल्यानंतर नवरदेवाच्या तोंडातले सिगारेट पुन्हा घेतात. अशा अनोख्या पद्धतीने ते नवऱ्या मुलाचे स्वागत करतात. या अनोख्या स्वागताची आता सोशल मीडियावर चर्चा आहे. 


अनोखी परंपरा


खरं तर व्हिडिओत दाखवलेला लग्नातील प्रसंग ही एक अनोखी परंपरा आहे, ज्यामध्ये सासू वराचे मिठाई, विडी आणि पान देऊन स्वागत करते. गुजरात राज्यात अशी परंपरा असल्याची माहीती आहे.या व्हिडिओच्या कॅप्शनला या परंपरेबाबत माहिती देण्यात आली आहे. दक्षिण गुजरातमधील काही गावांमध्ये ही जुनी परंपरा आहे. तो धुम्रपानही करत नाही, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्याने सिगारेटही पेटवली नाही, त्याने ती फक्त विधीसाठी केली. फक्त हसून त्याकडे दुर्लक्ष करा, त्यावर रागावण्याची गरज नाही,असेही म्हटले आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Joohi K Patel (@joohiie)


ब्लॉगर जुही पटेलने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. कारण अनेकांना अशाप्रकारची खरीच परंपरा आहे, यावर विश्वास बसत नाही आहे. तर काहिंनी बिहार आणि ओडिशामध्येही अशी परंपरा असल्याची माहिती दिली आहे.