TRENDING VIRAL VIDEO OF TIGRESS WITH CUBS :  :प्राण्यांमध्येसुद्धा माणसांप्रमाणेच भावना असतात हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध होतोय आई आणि मुलांमधील नातं हे अतूट असतं मग ते माणसांमधील असो किंवा प्राण्यांमध्ये.इंटरनेटवर सध्या वायरल होत असलेला व्हिडीओ(Tiger Cubs Video Viral) पुन्हा एकदा आई आणि मुलांमधील नात्याचं दर्शन घडवतो. या व्हिडिओमध्येCub tries to scare tigress video) वाघिणीसोबत तिचे बछडे खेळताना दिसत आहेत.वाघीण आणि तिचे बछडे यावेळी एकमेकांसोबत लपंडाव खेळत आहेत असच जणू वाटत आहे. हा व्हिडीओ पाहताना फारच क्यूट वाटत आहे आणि सोशल मीडियावर सुद्धा हा व्हिडीओ खूप पहिला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संबंधित व्हिडीओ वनपाल संजीव कुमार यांनी ट्विट केला आहे आणि आतापर्यं हा व्हिडीओ बरेच जणांनी पाहिलंय आणि खूप लाईक्स आणि कमेंटसुद्धा करण्यात आल्या आहेत. युजर्सनी छान छान कमेंट्ससुद्धा केल्या आहेत काहींनी तर 'क्युटनेस ओव्हरलोडेड','व्हेरी क्युट' सारख्या कमेंट्सचा पाऊस पाडला आहे आतापर्यंत जवळपास 45 हजार जणांनी हा व्हिडिओ पाहिलाय. 


 



वाघीण आपल्या बछड्यांसोबत यात खेळतेय,कधी हे बछडे तिच्या अंगावर उड्या मारत आहेत तर कधी एकमेकांना पकडताना दिसत आहेत तर कधी लपून बसत आहेत आणि शोधत आहेतं खरंच हा व्हिडीओ पहिल्यानंतर प्रत्येकाला स्वतःच्या आईसोबत लहानपणी खेळतानाचे सुंदर दिवस आठवल्याशिवाय राहणार नाही हे नक्की..