Trending News : सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ विचार करायला भाग पाडतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडतोय तो म्हणजे अद्भूत, अविस्मरणीय, निशब्द.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेनच्या तिकिटावर बनवलं स्केच
हा व्हिडिओ अभिजीत पंकजाक्षी नावाच्या व्यक्तीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram) पोस्ट केला आहे. या व्हिडिओत अभिजीत एक चित्र (Painting) बनवताना दिसत आहे. अभिजीतच्या प्रोफाईलवरुन तो एक आर्टिस्ट आहे. अभिजीतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या पेंटिंगचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. पण हा व्हिडिओ सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. 


रेल्वेच्या तिकिटावर बनवलं स्केच
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये अभिजीत पंकजाक्षी रेल्वेच्या तिकिटावर (Rilway Ticket) स्केच बनवताना दिसत आहे. व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे अभिजीत एका रेल्वेने प्रवास करत आहेत. त्यांच्या समोरच्या सीटवर बसलेली महिला झोपली असून तिच्या खांद्यावर डोकं ठेवून तिची मुलगीही झोपली आहे. या मायलेकीचं स्केट अभिजीतने रेल्वेच्या तिकिटावर रेखाटलं आहे. अगदी हुबेहुब हे चित्र असून पाहणाऱ्यांनी त्याच्या कलेचं कौतुक केलं आहे.



व्हिडिओला 41 लाख व्ह्यूज
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिजीत आणि त्याच्या चित्राचं निटिझन्सकडून कौतुक होत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ तब्बल 41 लाख लोकांनी पाहिला आहे, तर 3 लाख लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. काही युजर्सने आतापर्यंत पाहिलेला हा सर्वात सुंदर व्हिडिओ असल्याचीही प्रतिक्रिया दिली आहे.