मुंबई : अंड अगदी योग्य पद्धतीनं उकडणं हीसुद्धा एक कलाच आहे. आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवल? तर तसं नाहीये. कारण, उकडतानाच अंड फुटतंय ही अनेकांचीच तक्रार असते. काय म्हणता, तुम्हीही त्यापैकीच एक आहात का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही टीप्स फॉलो करुन आणि काही चुका टाळून आता तुम्हीही अंडी अगदी योग्य पद्धतीनं उकडू शकता. 


काय आहे अंड उकडण्याची योग्य पद्धत? 
अंड उकडण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यामध्ये पाणी गमर होऊ द्या. अंड मोठ्या भांड्यातच उकडा. याचा फायदा असा, की अनेक अंडी असल्यास त्यांची टक्कर होणार नाही. 


थंड पाण्यासोबतच अंड गॅसवर ठेवण्याची चूक करु नका. आधी पाणी गरम होऊ द्या. 


अंड उकडतेवेळी गॅसची आच कायम मध्यम ठेवा. उकळत्या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ मिसळा. जवळपास 15 मिनिटं अंड उकडल्यानंतर गॅस बंद करा. 


आता अंड गरम पाण्यातून काढून थंड पाण्यात ठेवा. 10 मिनिटांनंतर अंड पाण्यातून काढा आणि नंतर ते सोला. असं केल्यास अंड्याचं कवच सहजपणे निघतं. 


अंड व्यवस्थित सोलण्यासाठी आधी त्याला लहानशी तडा देऊन ते थंड पाण्यात ठेवावं. जर, उकडलेलं अंड थंड झालं असेल तर एका भांड्यात मीठ घालून ते तापवा आणि  त्यावर अंज ठेवा. अंड पुन्हा तुम्हाला अपेक्षा होती तसंच होईल. 


(वरील माहिती सर्वसामान्य निरिक्षणांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )