कोलकाता : कोर्टात याचिका दाखल करणा-यांपैकी एक असणा-या इशरत जहाँ हिने भाजपमध्ये प्रवेश केलाय. पश्चिम बंगालचे भाजप प्रदेश सरचिटणीस सायंतन बसू यांच्या उपस्थितीत इशरत भाजपमध्ये दाखल झालीय. 


पश्चिम बंगाल भाजपची माहिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रिपल तलाकविरोधी विधेयक मंजूर झाल्यामुळे मुस्लिम महिलांच्या लढ्याला यश आलंय. त्यामुळे एक भव्य कार्यक्रमाचं आयोजन करुन इशरतचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम बंगाल भाजपकडून देण्यात आलीय. 


इशरतला दिला होता फोनवरून तलाक


पश्चिम बंगालच्या हावडा इथं राहणा-या इशरतला तिच्या पतीने 2014 साली दुबईवरून फोन करून तलाक दिला होता. ट्रिपल तलाक हा बेकायदेशीर असून इशरतनं त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. 


पाच याचिकाकर्त्यांपैकी इशरत एक


ट्रिपल तलाकविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या पाच याचिकाकर्त्यांपैकी इशरत ही एक होती. ट्रिपल तलाकविरोधी विधेयक मंजूर झाल्याबद्दल इशरतने पंतप्रधान मोदींचे आभार मानलेत. तसंच भाजपमध्ये प्रवेश करुन चांगले वाटल्याची प्रतिक्रियाही तिने दिलीय.