नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं आज सूप वाजलं. मात्र या अधिवेशनातही राज्यसभेमध्ये तिहेरी तलाकविरोधी विधेयक रखडलंय. सर्व पक्षांचं या विधेयकावर एकमत होऊ शकलं नसल्यामुळे त्यावर राज्यसभेची मोहोर उमटू शकली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


हे विधेयक पुन्हा एकदा संसदेच्या सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्यात यावं, या मागणीवर काँग्रेस ठाम आहे. सकाळच्या वेळात दोन वेळा गोंधळामुळे कामकाज तहकूब झालं. आडीच वाजता पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर ज्या विधेयकांवर बहुतांश पक्षांचं एकमत आहे, त्यावर चर्चा आणि मतदान घेतलं जाईल असं उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी जाहीर केलं. त्यामुळे आपसूकच तिहेरी तलाकविरोधी विधेयक मागे पडलं. मात्र संसदेमध्ये पुन्हा एकदा निराशा पदरी पडल्यामुळे तलाक पीडित महिलांनी नाराजी व्यक्त केलीये.