नवी दिल्‍ली : तिहेरी तलाक विरोधी विधेयक आज लोकसभेत सादर केलं जाणार आहे. पण काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाचे नेते याला विरोध करणार आहे. यूपीएमधील जवळपास 14 पक्ष या विधेयकाला विरोध करणार आहे. लोकसभेत यूपीएचे जवळपास 100 खासदार आहेत. पण यांच्या विरोधानंतरही विधेयक मंजूर होणार आहे. कारण सरकारकडे लोकसभेत बहुमत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचं म्हणणं आहे की, हा कायदा बनवण्यासाठी संबंधित समाजासोबत चर्चा केली पाहिजे. भाजपने आपल्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे.


काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी ट्विट केलं आहे की, "तिहेरी तलाक विरोधी विधेयक आज लोकसभेत नाट्यमय पद्धतीने सादर केलं जाऊ शकतं. ट्रम्प यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधानांनी खुलासा केला नाही. यावरुन लक्ष हटवण्यासाठी? 


केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विरोधी पक्षाच्या विरोधानंतर ही 21 जूनला लोकसभेत मुस्लीम महिला (विवाह अधिकाराचं संरक्षण) विधेयक 2019 सादर केलं होतं. विरोधी पक्षाने यावर विस्तृत चर्चा व्हायला हवी अशी मागणी केली होती. विरोधक या विधेयकाच्या स्वरुपाच्या विरोधात आहेत.