नवी दिल्ली : मोठ्या सुटीनंतर आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला पुन्हा एकदा सुरूवात होतेय. लोकसभेत मंजूर झालेलं ट्रिपल तलाकविरोधी विधेयक आज राज्यसभेत मांडलं जाणार आहे. 


कॉंग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारनं याविधेयकला सगळ्या राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळवा असं आवाहन केलंय. पण राज्यसभेत सरकारला पाठिंबा नसल्यानं काँग्रेसच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे. लोकसभेत विधेयकाला पाठिंबा देण्याआधी काँग्रेसनं काही हरकती नोंदवल्या होत्या. आज राज्यसभेनं हे विधेयक मांडल्यावर ते संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवले जावे, अशी मागणी काँग्रेसकडून होण्याची शक्यता आहे. 


तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा


या विधयेकातील तरतूदीनुसार एकाच वेळी तीन वेळा ‘तलाक तलाक तलाक’ असे शब्द वापरून मुस्लिम महिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या पुरुषांना तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. शिवाय पोटगी आणि बालसंगोपनासाठीचा खर्चही ट्रिपल तलाक देणाऱ्या पुरुषांना करावा लागणार आहे.