मुंबई : मुस्लीम महिलांना न्याय देण्यासाठी राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र तरीही पुरुष तिहेरी तलाक अंतर्गत लग्नातून मुक्त होत असल्याचा प्रकार आजही होतना दिसत आहे. मुरादाबादच्या मुगलपुरा परिसरातील पोलिसांनी एका व्यक्तीला तिहेरी तलाक आणि पाच वेळा विवाह केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्यामुळे सिमरन अजीमने आपल्या पती विरोधात गुन्हा दाखल केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसीम अहमद असे तिच्या पतीचे नाव आहे. सिमरनने त्याला सतत विवाह करण्यास नकार दिल्यामुळे त्याने सिमरनला तिहेरी तलाक अंतर्गत तलाक दिला आहे. एवढचं नाही, तर महिलेने तिहेरी तलाक स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर त्याने पत्नीच्या भावाला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली.


त्यानंतर त्याने बळजबरीने स्टॅम्पपेपरवर पत्नीचे हस्ताक्षर करून घतले. महिलेने सांगितल्याप्रमाणे १७ जून रोजी वसीमने तिच्या भावासमोर तिला तलाक दिला आहे. चार वर्षांपूर्वी सिमरन आणि वसीमचा विवाह झाला होता. दिड वर्षांपूर्वी त्याने एका तरूण मुलीसोबत पळून लग्न केलं होत.


पाच पत्नींपैकी एका पत्नीने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. परंतू अद्यापही तो त्याच्या ४ पत्नींसोबत राहत आहे. सतत विवाह करण्यास नकार देऊनही त्याने लग्न केले. त्यामुळे महिला आपल्या बहिणीच्या घरी दिल्लीत आली होती. त्यानंतर पुन्हा मुरादाबादमध्ये येत तिने पतीविरोधात गुन्हा दाखल केला.