`अमित शहा राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट, राहुल नर्सरीत`
अमित शहा हे राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट आहेत तर राहुल गांधी अजून नर्सरीमध्येच आहेत
आगारतळा : अमित शहा हे राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट आहेत तर राहुल गांधी अजून नर्सरीमध्येच आहेत, अशी टीका आसामचे मंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी केली. दोन दशकं काँग्रेसमध्ये असलेले शर्मा १५ वर्ष तरुण गोगईंच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. २०१५ मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला.
पुर्वोत्तर राज्यांमध्ये भाजपला यश
पुर्वोत्तरमधल्या राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकींमध्ये भाजपला यश मिळालं आहे. त्रिपुरामध्ये भाजपला बहुमत मिळालं आहे. या राज्यामध्ये २५ वर्ष असलेली डाव्यांची सत्ता भाजपनं उलथवून लावली आहे. तर नागालँडमध्येही भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. ६० मतदारसंघाच्या या राज्यामध्ये भाजपला २९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे नागालँडमध्येही भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे निश्चित मानलं जात आहे.
मेघालयमध्ये मात्र काँग्रेस हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष बनला आहे. ५९ मतदारसंघाच्या या राज्यामध्ये काँग्रेसला २१ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला २ जागांवर यश मिळालं आहे.