Triwizard Chess: काळ्या पांढऱ्या सोंगट्यांसह तक्त्यासारख्या पटाच्या दोन्ही बाजूला बसून खेळायचा बैठा खेळ आहे. या पटावर 64 घरं असतात. एक राजा, एक वजीर, दोन हत्ती, दोन घोडे, दोन उंट आणि आठ प्यादी अशी दोन्ही बाजूला मांडणी असते. मात्र आता काळानुसार बुद्धीबळाच्या पटात अपडेट झाला आहे. आतापर्यंत दोन व्यक्तींना एकत्र बुद्धिबळ खेळताना पाहिलं असेल. पण नव्या बुद्धिबळ पटावर तीन जणांना (Triwizard Chess) खेळता येईल. IIT रुरकीच्या (IIT Roorkee) एका विद्यार्थ्याने नवीन बुद्धिबळ बोर्ड तयार केला आहे ज्यावर तीन लोक एकाच वेळी बुद्धिबळ खेळू शकतात. BTech 2014 बॅचच्या आदित्य निगमने आपल्या गेमिंग स्टार्टअपद्वारे हे नवीन बुद्धिबळ बोर्ड विकसित केले आहे. त्याला ट्रायविझार्ड बुद्धिबळ म्हणून ओळखले जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक खेळाडूकडे समान सोंगट्या असतील


आदित्य निगमने (Aditya Nigam) आयआयटी रुरकी येथे आयोजित बुद्धिबळ स्पर्धेदरम्यान या त्रिविझार्ड बुद्धिबळाची ओळख करून दिली होती. या ट्रायविझार्ड बुद्धिबळ पटाबाबत सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या नियमांमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. खेळ पूर्वीप्रमाणे खेळता येईल. मात्र, आता दोन ऐवजी तीन खेळाडू एकाच वेळी खेळू शकणार आहेत.


 


बुद्धिबळ खेळण्याकडे कल वाढावा यासाठी आदित्य निगम यांनी सांगितलं की, 'या नव्या फॉरमॅटमुळे खेळाडूंची संख्या वाढणार आहे. यामुळे संपूर्ण खेळाचा दृष्टीकोन बदलेल. या नवीन गेममध्ये तीन खेळाडूंसह, प्रत्येक खेळाडूला इतर दोन खेळाडूंच्या चाली एकाच वेळी समजून घ्याव्या लागतील.  वीन गेम क्लॉकवाइज पद्धतीने खेळायचा आहे. ज्यामध्ये प्रथम पांढरा, नंतर तपकिरी आणि शेवटी काळा रंगाच्या सोंगट्या असलेल्याला संधी मिळेल. एक खेळाडू दोन लोकांना एकाचवेळी चेकमेट देऊ शकतो.'