Transport Strike : राज्यासह देशभरातील इंधन टँकर चालकांनी संप पुकारलाय. केंद्र सरकारनं हिट अँड रन कायद्याद्वारे (Hit and Run Case) अपघातासंबंधी जाचक अटी घातल्याचा आरोप करत इंधन टँकर चालक संपावर (Truck Driver Strike) गेलेत. इंधन टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यभरात अनेक पेट्रोलपंपावरील इंधनाचा साठा संपलाय. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात, अनेक जागी मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय, ठिकठिकाणी इंधन टँकर चालक रस्त्यावर उतरुन आंदोलन करतायत. हिट अँड रन कायद्यात केंद्र सरकारनं केलेल्या बदलांमुळे हे टँकर चालक रस्त्यावर उतरलेत.  हिट अँड रन म्हणजे,अपघात झाल्यानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पळून जातो. हिट अँड रनच्या जुन्या कायद्यानुसार, अशा प्रकरणांमध्ये चालकाला जामीन मिळायचा आणि जास्तीत जास्त दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद होती. मात्र नव्या कायद्यानुसार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे 'हिट अँड रन' कायदा? 
नव्यानं तयार करण्यात आलेल्या 'हिट अँड रन' कायद्याचा कलम 104 मध्ये  समावेश करण्यात आला आहे. कलम 104 (अ) नुसार चुकीच्या पद्धतीनं वाहन चालवल्यामुळे किंवा निष्काळजीपणामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास, चालकाला जास्तीत जास्त 7 लाखांचा दंड ठोठावला जाईल. कलम 104 (ब) नुसार अपघात झाला आणि वाहनाला धडक दिल्यानंतर, चालक स्वतः किंवा वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला, तर त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल.


काय आहे ट्रक चालकांची मागणी?
वाहनाची धडक बसून कुणी जखमी झालं आणि ड्रायव्हर्स घटनास्थळी थांबले तर जमाव हिंस्त्र होऊन मारहाण करतो. ही बाब लक्षात घ्यावी आणि कायद्यातील जाचक अटी कमी कराव्यात अशी टँकर चालकांची मागणी आहे. हिट अँड रन कायद्याला विरोध नसून कठोर शिक्षेची जी तरतूद करण्यात आलीय त्याला इंधन टँकर चालकांचा विरोध आहे. आता केंद्र सरकार याबाबत काय भूमिका घेतं हे पाहावं लागेल..


संपाचा कोणत्या सेवांवर परिणाम?
ट्रक चालकांनी संप पुकारल्याने पेट्रोल-डिझेल, LPG गॅस सिलिंडर वाहतूक थांबली आहे. पुरवठा ठप्प झाल्यानं पंपांवरील इंधन संपलंय. परिणामी इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर तुडुंब गर्दी पाहिला मिळतेय. भाजीपाला, शेतमालाची वाहतूक विस्कळीत झाली असून लिलाव ठप्प झालेत. इतकंच काय तर खासगी शाळांच्या बसेसची वाहतूकही रद्द करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या एसटी वाहतुकीलाही ट्रक चालकांच्या संपाचा फटका बसलाय.


इंधन कंपन्यांना फटका
ट्रक चालकांच्या आंदोलनाचा फटका इंधन कंपन्याना बसलाय.चेंबूर येथील HPCL आणि BPCL कंपनीचे 10 हजारांच्या आसपास टँकर आज कंपनीत गेले नाहीत. पोलिसांनी या आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तसच हिंसक आंदोलन करू नये अश्या सूचनाही दिल्या. त्यानंतर चालकांनी शांततेत स्टेअरिंग बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.