नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा मुलगा डोनाल्ड ट्रंप ज्यूनियर दिल्लीला पोहोचले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोनाल्ड ट्रंप ज्यूनियर भारताच्या एक आठवड्यांच्या दौऱ्यावर ते आहेत. डोनाल्ड ट्रंप ज्यूनियर गुरुग्राममध्ये आपल्या लग्‍जीरियस रेजिडेंशियल प्रोजेक्ट 'ट्रंप टावर्स'ला लॉन्‍च करणार आहेत. याचं निर्माण ट्रंप यांची कंपनी 'ट्रंप ऑर्गनाइजेशन' करणार आहे.


राष्ट्राध्यक्षांचा मुलगा या कंपनीचा एग्जीक्यूटिव डायरेक्टर आहे. ट्रंप टावर्स गुरुग्राममधील सर्वात उंच इमारत असणार आहे. यासाठी ५ वर्ष लागणार आहे. ट्रंप ऑर्गनाइजेशन मुंबई, पुणे, कोलकाता आणि गुरुग्राममध्ये चार रियल एस्टेट प्रोजेक्टवर काम करत आहे. 


दिल्लीमध्ये 23 आणि 24 फेब्रुवारीला होणाऱ्या 'ग्लोबल बिजनेस समिट'च्या एका सेशनला डोनाल्ड ट्रंप ज्यूनियर संबोधित करणार आहेत. याशिवाय कोलकाता, मुंबई आणि पुण्याला देखील ते जाणार आहेत. ज्यूनियर ट्रंप यांनी एका इंटरव्यूमध्ये म्हटलं की, भारतासोबत संबंध बनवण्यासाठी त्यांना १ दशक घातला आहे. त्याचा परिणाम आता दिसत आहे.


ज्यूनियर ट्रंप यांची बहिण इवांका ट्रंप देखील काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर आली होती. नोव्हेंबरमध्ये हैदराबादमध्ये ग्‍लोबल एंटरप्रेन्‍योरशिप समिटमध्ये इवांकाने भाग घेतला होता.