मुंबई : कांद्याच्या वाढलेल्या दरामुळे देशातील जनता अस्वस्थ आहे. शंभरी पार गेलेल्या कांद्यामुळे गृहिणींचं महिन्याचं बजेट कोलमडलं आहे.  कांद्याच्या वाढलेल्या दरामुळे सामान्यांच्या डोळ्यात पाणी आलं. पण आता कांद्याच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात तुर्कस्तानातून कांदा दाखल झाला आहे. आतापर्यंत परदेशातून आयात करण्यात आलेल्या कांद्याच्या तुलनेत तुर्कस्तानाचा कांदा आधिक दर्जेदार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुर्कस्तानाचा कांदा मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर पुण्याच्या गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी तुर्कस्तानातून एक लाख किलो कांद्याची आवक झाली. तुर्कस्तानाच्या कांद्याला ८० रूपये प्रती किलोचा भाव मिळाला आहे. 


तुर्कस्तानाचा कांदा हा भारतीय कांद्याप्रमाणे भरीव असल्यामुळे राज्यात या कांद्याला चांगली मागणी आहे. अफगाणिस्तान आणि इजिप्तच्या कांद्याच्या तुलनेत तुरर्कस्तानचा कांदा आधिक चांगला आहे. तर इजिप्तचा कांदा पोकळ असल्यामुळे या काद्याला मागणी नव्हती. 


नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव सहा ते सात हजारावर आले आहेत. असे असताना कांद्याची राजधानी असलेल्या या नाशिक शहरात कांद्याचे आणि सफरचंदाचे भाव समसमान आहेत. कांदा किरकोळ बाजारात कांदा शंभऱ रूपयांवर गेला आहे. जवळपास तेवढाच भाव सफरचंदालाही आहे.