नवी दिल्ली : पासपोर्टचा रंग बदलून तो नारंगी करण्याचा सरकारचा निर्णय १७ दिवसाताच सरकारने बदलला आहे. त्याचबरोबर शेवटच्या पानावर खाजगी माहिती छापण्याचा निर्णयही मागे घेण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 


भारताच्या पासपोर्टचे हे स्थान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्लोबल पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताचा पासपोर्टचे रॅंकींग ७२ वे आहे. विझा नसताना पासपोर्ट घेऊन किती देशात जाऊ शकतो, यावरून हे रॅंकींग ठरते. पण तुम्हाला माहित आहे का की जगातील महागडा पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे?


सर्वात महागडा पासपोर्ट


पासपोर्टप्रमाणे वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये वर्ल्ड रॅंकींग ठरवणारी संस्था वर्ल्‍ड अॅटलसनुसार, सध्या तुर्कीचा पासपोर्ट सर्वात महागडा आहे. तुर्कीत पासपोर्ट बनवण्यासाठी भारतापेक्षा तब्बल १० पट अधिक किंमत मोजावी लागते. भारतात पासपोर्ट बनवण्यासाठी १५०० रुपये खर्च येतो तर तुर्कीत हा पासपोर्ट सुमारे १४ हजार रुपयांचा असेल. 


या देशात सर्वात महागडा पासपोर्ट


  • तुर्की- १४ हजार रुपये

  • ऑस्‍ट्रेलिया- १२ हजार रुपये

  • स्विझर्लण्ड- १० हजार रुपये

  • मॅक्सिको- ९.२ हजार रुपये

  • अमेरिका- ८ हजार रुपये

  • इटली- ८ हजार रुपये

  • कॅनडा- ७.७ हजार रुपये

  • जपान- ७.५ हजार रुपये

  • न्युझीलॅंड- ७.५ हजार रुपये

  • ब्रिटेन- ७.२ हजार रुपये


भारताच्या पासपोर्टची ताकद


  • ५५ देशात भारतीय पासपोर्टधारक व्हिजाशिवाय जाऊ शकतात.

  • २५ देशात कोणत्याही प्रकारे व्हिजा घेण्याची गरज नाही.

  • ३० देशात गेल्यानंतर व्हिजाची सुविधा मिळेल.

  • जर्मनीचा पासपोर्ट जगात पहिल्या नंबरवर आहे. या देशातील पासपोर्ट धारक १६१ देशात व्हिजाशिवाय जाऊ शकतात.