गुजरातच्या राजकारणातला ट्विस्ट...
अनपेक्षितपणे कॉँग्रेसने गुजरातच्या निवडणुकीत आघाडी गुजरातच्या राजकारणाने वळण घेतलय.
अहमदाबाद : अनपेक्षितपणे कॉँग्रेसने गुजरातच्या निवडणुकीत आघाडी घेतल्याने गुजरातच्या राजकारणाने वळण घेतलय.
राजकीय बदल
कॉँग्रेसने 84 जागांवर मुसंडी मारल्याने गुजरातची सत्ता कॉँग्रेसच्या हाती जाणार अशी चिन्ह निर्माण झाली आहे. भाजप एक हाती सत्ता मिळवणार असं वातावरण असताना एकदम विरूद्ध चित्र निर्माण झालं आहे. जर भाजपच्या हातातून सत्ता गेली तर काय ? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
कॉँग्रेसची जादू
पंजाच्या तडाख्याने कमळ कोमेजलं आहे. अननुभवी आणि अपरिपक्व म्हणून समजले गेलेल्या राहुल गांधींनी मोदी आणि भाजप परिवाराला मोठीच चपराक बसली आहे. देशभरात कॉँग्रेसची पीछेहाट होत असताना गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. गुजरातच्या निवडणुकीत राहुल गांधी प्रभाव पाडू शकणार नाहीत, मोदी-शहा पु्न्हा एकदा सत्ता खेचून आणणार असच चित्र होतं.
अस्वस्थ भाजप
भाजपच्या गोटात मात्र या निकालांनी चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. भाजपला पराभवाला सामोरं जावं लागतय की काय, असंच चित्र गुजरातमध्ये तयार झालं आहे. मोदी-शहा गटाला हा मोठाच दणका आहे.