Elon Musk Twitter: मागील काही दिवसात ट्विटर (Twitter) सर्वकाही सुरळीत असल्याचं चित्र दिसत नाही.  प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून अनेक घडामोडींना वेग आला आहे. ब्लू टिक (Twitter Blue Tick) प्रकरण असो किंवा खऱ्या माहितीचा मोगावा... त्यामुळे अधिकारी आणि मालक यांच्यात वेळोवेळी खटके उडाल्याचं दिसतंय. अशातच आता अधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे (Twitter Employees resign) दिल्याची माहिती समोर आली आहे. (Twitter Employees Left Meeting As Elon Musk Continued Speaking and give resign)


नेमकं काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलॉन मस्क यांनी कंपनीच्या व्यवस्थेमध्ये मोठे बदल केले. त्यामुळे अनेक कर्मचारी नाराज होते. मस्क यांनी (Elon Musk Twitter) गुरूवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी अनेक अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी काही निर्णयावरून एलॉन मस्क आणि अधिकाऱ्यांमध्ये मतभेद दिसून आले. त्यानंतर काही अधिकारी मिटिंग सुरू असतानाच निघून गेल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्यांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे.



इतर घडामोडी सुरू असतानाच ट्विटर कंपनीची (Twitter) सर्व कार्यालये तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येत आहेत, असं कंपनीने कर्मचाऱ्यांना कळवलंय. त्यामुळे आता ट्विटरचं काय होणार?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.  21 नोव्हेंबर रोजी ऑफिस पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे.


आणखी वाचा - Ambani-Adani news : या वर्षी फक्त अंबानी आणि अदानी झाले मालामाल


दरम्यान, ट्विटरच्या काही निर्णयावर संस्थापक जॅक डोर्सीने (Jack Dorsey) सडकूट टीका केली होती. एलॉन मस्क यांनी आपण खरी माहिती देणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर कोणत्या आधारावर माहिती खरी की खोटी ठरवणार?, असा सवाल जॅक डोर्सीने (Jack Dorsey On Elon Musk) विचारला होता.