India Vs Bharat: G-20 परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी येत्या 9 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. या निमंत्रण पत्रिकेवर द प्रेसिडेंट ऑफ भारत (President Of Bharat) असा उल्लेख केला आहे. यामुळं देशातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. इंडियाचं (India) भारत असं नामांतर केले जात असल्याच्या चर्चांना जोर धरु लागला आहे. अशातच सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगली आहे. भारतातील (Bharat) अनेक संस्थांच्या नावात इंडिया असा उल्लेख आढळतो जर नामांतर झालेच तर या संस्थाचे नाव कसे असेल? हे नेटकऱ्यांनी सांगितलं आहे. (India vs Bharat Row)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर Bharat vs India हा शब्द ट्रेंड होत आहे. यात युजर्सने इस्रोपासून ते IITपर्यंतचे नामांतर केले आहे. एका युजरने म्हटलं आहे की आता इस्रोचे नाव बदलून बिस्रो ठेवणार का? तर, एका युजरने म्हटलं आहे की SBIचे नाव बदलून आता SBB असं ठेवणार का. युजर्सचे हे मीम सध्या तुफान व्हायरल होत आहेत. 



पुन्हा नोटबंदी होणार?


सोशल मीडियावर सध्या INDIA Vs Bharat यावरुन चर्चा रंगल्या आहेत. एका युजरने पाचशे व पन्नास रुपयांच्या नोटेचा फोटो ट्विट करुन लिहलं आहे की आपल्याला पुन्हा नोटबंदीचा सामना करावा लागणार का? कारण भारताच्या नोटेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं लिहलं आहे. 


मेड इन इंडिया गाणे सोशल मीडियावर ट्रेंड 


INDIA Vs Bharat या वादानंतर पुन्हा एकदा अलीशा चिनॉय हिचे मेड इन इंडिया गाणे ट्विटरवर ट्रेंड करत आहे. युजर्सने या गाण्याची छोटीशी झलक ट्विट करत त्यावर Made In Bharat असं लिहलं आहे. काही युजर्सने तर इंडियाचे भारत असं नाव केल्यास काय काय बदल होतील याची पूर्ण लिस्टच जारी केली आहे. 


ISRO = BSRO
IIT = BIT
IMA = BMA
IAF = BAF
IPL = BPL
SBI = SBB
INC = BNC
AIFF = BIFF
IPS = BPS
IAS = BAS



विरोधकांकडून कडाडून विरोध


सध्या इंडिया आघाडीची जोरदार चर्चा असल्यानंच आता, इंडियाचं भारत असं नामांतर केलं जात असल्याचा आक्षेप विरोधकांनी केला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी या नामांतराला जोरदार विरोध केला आहे.