रावणाच्या `आधार कार्ड`वर सरकारचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल
संपूर्ण देश आणि जगभरात साजरा केल्या जाणाऱ्या दसरा सणानिमीत्त Unique Identification Authorityने (युआयडीएआय) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून नागरिकांना शुभेच्छा दिल्या. मात्र, काही वेळात या शुभेच्छा सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्या.
मुंबई : संपूर्ण देश आणि जगभरात साजरा केल्या जाणाऱ्या दसरा सणानिमीत्त Unique Identification Authorityने (युआयडीएआय) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून नागरिकांना शुभेच्छा दिल्या. मात्र, काही वेळात या शुभेच्छा सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्या.
'युआयडीएआय'ने ट्विटरवरून दसरा सणाच्या शुभेच्छा देताना रावणाची प्रतिमा शेअर केली. सोबत 'जगाने सुशासन पाहिले. त्यामुळे आमच्या सोबत निर्मळ मनाने आधार कार्डचा नियमीत वापर करा', अशा शुभेच्छा दिल्या. या ट्विटवर अनेक यूजर्सनी आपापल्या प्रतिक्रीया दिल्या.
दरम्यान, एका ट्विटरवर एका यूजर्सने प्रश्न केला की, 'सर, रावण आधार कार्ड कसे काय बनवू शकतो? कारण, रावणाला तर दहा तोंडे आहेत.' यूजर्सच्या या ट्विटला प्रतिक्रीया देतना 'युआयडीएआय'कडून मजेशी उत्तर आले. 'युआयडीएआय'ने म्हटले की, 'रावणाचे आधार कार्ड नाही बनू शकत कारण, रावण भारतात राहात नाही'. हे ट्विट पाहताच यूजर्सनी यावर प्रचंड प्रतिक्रीया दिल्या. काही वेळातच हे ट्विट तीन हजारहून अधिकवेळा रिट्विट झाले तर,चार हजारहून अधिक लोकांनी याला लाईकही केले.