पाकिस्तानचा सीमारेषेवर गोळीबार, दोन जवान शहीद
पाकिस्ताननं सीमेवर केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवानांना वीरमरण आलंय.
केरन : पाकिस्ताननं सीमेवर केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवानांना वीरमरण आलंय. जम्मू काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. पाकिस्तानी सैन्यानं अंदाधुंद गोळीबार केलाय. यावेळी पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहिद तर दोन ते तीन भारतीय जवान जखमी झालेत. गेल्या काही दिवसांपासून सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला जशास तसं प्रत्युत्तर दिलंय.